पावसाने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये घेतली विश्रांती, पण सहा राज्यांवर अस्मानी संकट

Rains took break in Maharashtra and Gujarat but heavy rain alert for six states : पावसाने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रात पाऊस पडेल पण जोर कमी असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Rains took break in Maharashtra and Gujarat but heavy rain alert for six states
पावसाने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये घेतली विश्रांती  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पावसाने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये घेतली विश्रांती
  • सहा राज्यांवर अस्मानी संकट
  • ईशान्य अरबी समुद्र आणि गुजरातच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये जोरदार वारे वाहतील

Rains took break in Maharashtra and Gujarat but heavy rain alert for six states : पावसाने महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना दोन आठवडे झोडपून काढले. आता पावसाने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रात पाऊस पडेल पण जोर कमी असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरयाणा, जम्मू-काश्मीर आणि राजस्थान या सहा राज्यांमध्ये पुढील तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये १६ जुलैपर्यंत, राजस्थानमध्ये १७ जुलैपर्यंत, पंजाब आणि हरयाणामध्ये १९ जुलै पर्यंत तर उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये १७ जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 

महाराष्ट्रात विदर्भामध्ये तसेच छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा, गोवा, केरळ, कर्नाटकचा किनारी भाग येथे पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. १६ जुलै रोजी तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. 

ईशान्य अरबी समुद्र आणि गुजरातच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये जोरदार वारे वाहतील. यातून कमी दाबाचे नवे क्षेत्र निर्माण होईल. उत्तर ओडिशा आणि लगतच्या भागातले कमी दाबाचे क्षेत्र हळू हळू नैऋत्य दिशेने सरकत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी