धक्कादायक: ऑनलाईन गेम खेळणाऱ्या १२ वर्षीय मुलाची आत्महत्या, मृत्यूपूर्वी अंगावर बांगड्या-मंगळसूत्र

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 20, 2019 | 22:13 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

राजस्थानच्या कोटामधील आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे.सकाळी जेव्हा आपला मुलगा खोलीतून बाहेर आला नाही तेव्हा आई-वडिलांनी खोलीचा दरवाजा तोडला.यानंतर त्यांच्यासमोर जे आलं ते खूपच दु:खी आणि धक्कादायक करणारं होतं.

Suicide
गेम खेळतांना १२ वर्षीय मुलाची आत्महत्या  |  फोटो सौजन्य: Getty Images

कोटा: राजस्थानच्या कोटा शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तिथं एक १२ वर्षांच्या मुलानं मोबाईलवर गेम खेळता-खेळता आत्महत्या केली. कोटा इथं घडलेली ही आतापर्यंतची पहिलीच घटना आहे. एका मुलानं गेम खेळल्यानंतर आत्महत्या केली असेल. १२ वर्षीय कुशालनं गेम खेळल्यानंतर स्वत:ला फाशी लावून घेतली. गेम खेळत असताना कुशालनं बांगड्या आणि मंगळसूत्र घातलेलं होतं. रिपोर्ट्सनुसार मुलगा दिवसांपासून ऑनलाईन गेम खेळत होता.

न्यूज १८च्या रिपोर्ट्सनुसार कुशाल खेळत असलेला गेम हा ‘ब्लू व्हेल गेम’सोबत मिळता-जुळता असलेल्या गेम होता. कुशाल खूप दिवसांपासून हा गेम खेळत होता. कोटा इथल्या विज्ञान नगर भागात तो राहत होता. आई-वडिलांनी सांगितलं की रात्री जेवण केल्यानंतर मुलगा आपल्या खोलीत गेला होता.

कुशालचा मृतदेह त्याच्या खोलीच्या जवळ असलेल्या बाथरूममध्ये सापडला. जेव्हा सकाळी त्यानं दरवाजा उघडला नाही, तेव्हा आई-वडिलांनी खोलीचं दार उघडलं आणि त्यानंतर त्यांनी जे पाहिलं ते धक्कादायक होतं. मुलाचा मृतदेह बाथरूमच्या छतावर लटकलेलं होतं. कुशालचे आई-वडील त्याच्या मृतदेहावर मंगळसूत्र आणि बांगड्या बघून आश्चर्यचकीत झाले.

कुशालला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण तिथं गेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केलाय. मात्र अद्याप कुशाल कोणता गेम खेळत होता, ही माहिती काही मिळालेली नाही. पोलिसांचं म्हणणं आहे की, पुढील तपासानंतर कुशालच्या मृत्यूचं कारण माहिती पडेल. २०१८ साली ‘ब्लू व्हेल गेम’मुळे संपूर्ण देशात अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या.

‘ब्लू व्हेल गेम’ हा मोबाईलवरील एक ऑनलाईन गेम आहे. जो काही दिवसांचं चॅलेंज खेळणाऱ्याला देतो. एकेका टप्प्यावर विविध अवघड गोष्टी करायला सांगून अखेर मृत्यू या गेमचा शेवट करतो. हा गेम खेळून भारतातच नाही तर जगभरात अनेक मुला-मुलींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. विशेष म्हणजे जी मुलं नैराश्यग्रस्त किंवा एकटे पडलेले असतात, असे मुलं हा गेम खेळत असल्याचं दिसून आलं होतं.

सलग ६ तास पबजी खेळल्याने मृत्यू

मुंबईत अशीच एक घटना समोर आली होती. सलग ६ तास मोबाईलवर पबजी गेम खेळल्याने एका १६ वर्षीय मुलाने आपला जीव गमावला होता. सलग सहा तास गेम खेळत असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, मोबाईलवर गेमचे हे व्यसन मुलांना चांगलेच भारी पडत असल्याचे या घटनांमधून समोर येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
धक्कादायक: ऑनलाईन गेम खेळणाऱ्या १२ वर्षीय मुलाची आत्महत्या, मृत्यूपूर्वी अंगावर बांगड्या-मंगळसूत्र Description: राजस्थानच्या कोटामधील आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे.सकाळी जेव्हा आपला मुलगा खोलीतून बाहेर आला नाही तेव्हा आई-वडिलांनी खोलीचा दरवाजा तोडला.यानंतर त्यांच्यासमोर जे आलं ते खूपच दु:खी आणि धक्कादायक करणारं होतं.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
भारतीय सैन्याची मोठी कारवाई, PoKमधील दहशतवादी तळं उद्धवस्त 
भारतीय सैन्याची मोठी कारवाई, PoKमधील दहशतवादी तळं उद्धवस्त 
रुग्णासोबत डॉक्टर महिलेचे शारीरिक संबंध, नंतर रुग्णावरच केला बलात्काराचा आरोप 
रुग्णासोबत डॉक्टर महिलेचे शारीरिक संबंध, नंतर रुग्णावरच केला बलात्काराचा आरोप 
[VIDEO]: महिलेला बेदम मारहाण, निर्वस्त्र करुन गावात फिरवलं
[VIDEO]: महिलेला बेदम मारहाण, निर्वस्त्र करुन गावात फिरवलं
PHOTOS: 'ती'  निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत, विधानसभा निवडणुकीत सेल्फी
PHOTOS: 'ती'  निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत, विधानसभा निवडणुकीत सेल्फी
[VIDEO]: हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट, एक जण जखमी
[VIDEO]: हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट, एक जण जखमी
लिव-इनमधील गर्लफ्रेंडच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं असं काही की, तुम्हीही व्हाल हैराण
लिव-इनमधील गर्लफ्रेंडच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं असं काही की, तुम्हीही व्हाल हैराण
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० ऑक्टोबर २०१९: धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल ते पंकजांची पहिली प्रतिक्रिया
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० ऑक्टोबर २०१९: धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल ते पंकजांची पहिली प्रतिक्रिया
'निवडणुका असल्यावरच पाकिस्तानबाबत सर्जिकल पॅटर्न का होतो?' काँग्रेस नेत्याचा सवाल
'निवडणुका असल्यावरच पाकिस्तानबाबत सर्जिकल पॅटर्न का होतो?' काँग्रेस नेत्याचा सवाल