12th Rajasthan Board Exams : कोरोना व्हायरसची (Corona virus) रुग्ण (Patient) संख्या देशभरात वाढत आहे. भारतात (India) दररोज सुमारे २ लाख जण कोरोना संक्रमीत (Corona infected) होत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारचे निर्बंध राज्य सरकारांमार्फत (State Governments) लावले जात आहेत. या संकटामुळे काही राज्यांच्या बोर्ड परीक्षांवरही (Board exams) परिणाम होत आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील शाळांचे काही वर्ग बंद करण्यात आले आहेत. तर परीक्षांविषयी निर्णय घेणं बाकी आहे. वाढत्या कोरोनाच्या संकटात राजस्थान बोर्डाने (Rajasthan Board ) १७ जानेवारी २०२२ पासून सुरू होणारी बारावी बोर्डाची प्रॅक्टिकल परीक्षा (Twelfth Board Practical Examination) लांबणीवर टाकली आहे.
दुसरीकडे बिहार राज्यातील दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा तोंडावर आहेत. १ फेब्रुवारी २०२२ पासून बारावी आणि १७ फेब्रुवारी २०२२ पासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. मात्र कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर परीक्षा ढकलण्याचा बिहार सरकारचा कोणतीही विचार नाही. मागील वर्षी देखील बिहारने बोर्ड परीक्षांचे आयोजन केले होते. बिहारमध्ये गेल्या २४ तासात कोरोनाचे ५,९०८ रुग्ण संक्रमित झाले आहेत. राज्यात वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे बोर्ड परीक्षा होणार की नाही अशी चर्चा जोरावर होती. पण बिहार शिक्षण मंडळाने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.