Rajasthan Dalit Boy Death : राजस्थानमध्ये दलित विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या निषेधार्थ काँग्रेस आमदाराचा राजीनामा, राज्यसरकारला सुनावले खडेबोल

राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात एका शिक्षकाने ९ वर्षीय दलित विद्यार्थ्याला मारहाण केली, या मारहाणीत या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे आमदार पानाचंद मेघवाल यांनी राजीनामा दिला आहे. देश आणि राज्याच्या व्यवस्थेला दोष देत आमदार मेघवाल यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे.

rajasthan mla
पानाचंद मेघवाल   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात एका शिक्षकाने ९ वर्षीय दलित विद्यार्थ्याला मारहाण केली, या मारहाणीत या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
  • या घटनेच्या निषेधार्थ सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे आमदार पानाचंद मेघवाल यांनी राजीनामा दिला आहे.
  • व्यवस्थेला दोष देत आमदार मेघवाल यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे.

Rajasthan Dalit Boy Death : जयपूर : राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात एका शिक्षकाने ९ वर्षीय दलित विद्यार्थ्याला मारहाण केली, या मारहाणीत या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे आमदार पानाचंद मेघवाल यांनी राजीनामा दिला आहे. देश आणि राज्याच्या व्यवस्थेला दोष देत आमदार मेघवाल यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. मेघवाल यांनी या पत्रात म्हटले आहे की, भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाले, देशात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. असे सले तरी राज्यात दलित आणि वंचित वर्गावर सातत्याने अन्याय आणि अत्याचार होत असल्याचे त्यांनी सांगितले.  (rajasthan congress mla Panachand Meghwal Sent Resignation to cm ahsok gehlot dalit student death)

घोडीवर चढण्यास मनाई तर मिश्या ठेवण्यास विरोध

आमदार पानाचंद मेघवाल यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, राज्यात दलितांना माठातून पाणी पिण्यास मनाई आहे. तर काही ठिकाणी घोडीवर चढण्यास मज्जाव केला जातो. तर काही ठिकाणी दलितांनी मिशा ठेवल्यास जिवे मारले जाते. चौकशीच्या नावार इथली फाईल तिकडे केली जाते आणि न्यायालयीन प्रक्रिया अडकवली जाते. गेल्या काही वर्षांत दलितांवर अत्याचार वाढत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दलित आणि वंचितांसाठी जो समनातेचा अधिकार दिला त्याचे रक्षण करणारे कोणीच नाही असे दिसत आहे असेही मेघवाल म्हणाले. 


आपल्याच सरकारवर प्रश्नचिन्ह

आमदार पानाचंद मेघवाल यांनी आपल्या राजीनाम्यात आपल्या सरकारला प्रश्न विचारले आहेत. दलितांच्या अत्याचारांच्या प्रकरणांवर बहुतांश वेळी गुन्हा दाखल होतो परंतु विधानसभेत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतरही पोलीस काहीच कारवाई करत नाही असे सांगून मेघवाल यांनी आपलाच सरकारला खडेबोल सुनावले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी