Rajasthan: हैवान झाला मुख्याध्यापक, मारहाणीत फुटली कानाची नस; तिसरीतल्या दलित विद्यार्थ्याचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Aug 14, 2022 | 09:08 IST

Rajasthan crime news: शिक्षण विभागाला हादरवाणारी बातमी समोर येत आहे. जातिभेद आणि अस्पृश्यतेच्या या दुष्कृत्याने राजस्थानमधील जालोर येथे एका 9 वर्षाच्या निष्पाप दलित मुलाचा (Dalit Boy) जीव घेतला आहे.

Rajasthan News
शिक्षकाच्या मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • राजस्थानमध्ये (Rajasthan) मुख्याध्यापकाच्या माठातील पाणी प्यायल्याची शिक्षा एका दलित विद्यार्थ्याला गमावावा लागला आहे.
  • या मारहाणीत त्याच्या कानाची नस फुटली.
  • शनिवारी दुपारी चारच्या सुमारास अहमदाबादमध्ये उपचारादरम्यान विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

राजस्थान: Punishment for drinking water,Third class Dalit student killed: शिक्षण विभागाला हादरवाणारी बातमी समोर येत आहे.  जातिभेद आणि अस्पृश्यतेच्या या दुष्कृत्याने राजस्थानमधील जालोर येथे एका 9 वर्षाच्या निष्पाप दलित मुलाचा (Dalit Boy)  जीव घेतला आहे. ही घटना जालोर (Jalore district) जिल्ह्यातील सायला उपविभागातील सुराणा गावातील आहे. राजस्थानमध्ये (Rajasthan) मुख्याध्यापकाच्या माठातील पाणी प्यायल्याची शिक्षा एका दलित विद्यार्थ्याला गमावावा लागला आहे.

येथे एका 9 वर्षाच्या विद्यार्थ्यानं पाणी पिण्यासाठी शाळेच्या भांड्याला हात लावला तेव्हा शाळेतील शिक्षकाने त्याला जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या कानाची नस फुटली. यानंतर त्याला उपचारासाठी उदयपूरला पाठवण्यात आले आणि नंतर उदयपूरहून अहमदाबादला पाठवण्यात आलं. मात्र शनिवारी दुपारी चारच्या सुमारास अहमदाबादमध्ये उपचारादरम्यान विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

अधिक वाचा- स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दहशतवादी हल्ल्यानं हादरलं जम्मू-काश्मीर, ग्रेनेड हल्ल्यात जवान जखमी

सुराणा येथील सरस्वती विद्यालयात तिसरीत शिकणारा विद्यार्थी इंद्रकुमार मेघवालने शनिवारी अहमदाबादच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी मुख्याध्यापकाला ताब्यात घेतलं आहे. ही घटना 20 जुलै रोजी घडली आहे.

मृत विद्यार्थ्याच्या काकानं या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. विद्यार्थ्याचा काका किशोर मेघवाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, विद्यार्थ्यानं आपल्या माठातील पाणी प्यायल्यानं छैल सिंह याला एवढा राग आला की, त्यानं इंद्रकुमारला बेदम मारहाण केली. मुलगा घरी आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर त्याला उदयपूरमध्ये नेलं. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला अहमदाबादमध्ये हलवण्यात आलं शनिवारी त्याचा मृत्यू झाला. आरोपीला गावातून ताब्यात घेण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी जालोरच्या सीओवर सोपवण्यात आल्याचे जालोर पोलिसांनी सांगितलं आहे.  पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. राजस्थानच्या शिक्षण विभागाने याप्रकरणी चौकशी समिती स्थापन केली आहे. जालोरचे एसपी हर्षवर्धन अग्रवाल यांनी मृताच्या घरी जाऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली.

जुलै महिन्यातील घटना 

ही घटना 20 जुलैची सुराणा गावातील सरस्वती विद्या मंदिर शाळेची आहे. जिथे तिसरीत शिकणाऱ्या एका दलित मुलाला शाळेचे संचालक छैल सिंह यांनी माठाला हात लावल्यानं मारहाण केली. एवढंच नाही तर मुलाचा जातीवाचक शब्दांत अपमानही केला आहे. 

अधिक वाचा- मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंचे अपघाती निधन

या प्रकरणी पोलिसांनी जातीवाचक शब्दांत अपमानित करून विद्यार्थ्याला मारहाण करून ठार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.  छैल सिंह यांच्यासाठी वेगळं ठेवलेल्या माठातून विद्यार्थ्याने पाणी प्यायल्याचं सांगितलं जात आहे. विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीत त्याच्या उजव्या कानाला आणि डोळ्याला अंतर्गत जखमा झाल्या होत्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी