Rajasthan Gang Rape : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार, खून करून मृतदेह फेकला विहरीत, आरोपी कालुरामला अटक

राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  लिफ्ट देण्याच्या बहाण्याने काही नराधमांनी एका विवाहित महिलेवर सामुहिक बलात्कार केला आहे. तसेच तिचा खून करून तिचा मृतदेह विहरीत फेकला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्यम आरोपी कालुरामला अटक केली आहे.

rajasthan gangrape
बलात्कार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  लिफ्ट देण्याच्या बहाण्याने काही नराधमांनी एका विवाहित महिलेवर सामुहिक बलात्कार केला आहे.
  • तसेच तिचा खून करून तिचा मृतदेह विहरीत फेकला आहे.
  • या प्रकरणी पोलिसांनी मुख्यम आरोपी कालुरामला अटक केली आहे.

Gangrape : जयपूर : राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  लिफ्ट देण्याच्या बहाण्याने काही नराधमांनी एका विवाहित महिलेवर सामुहिक बलात्कार केला आहे. तसेच तिचा खून करून तिचा मृतदेह विहरीत फेकला आहे या प्रकरणी पोलिसांनी मुख्यम आरोपी कालुरामला अटक केली आहे. तसेच इतर आरोपींचा शोध सुरू आहे. 

२४ एप्रिल रोजी एक ३५ वर्षीय विवाहित महिला राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील आपल्या माहेरी जात होती. तेव्हा लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कालुराम आणि इतर साथीदारांनी महिलेला गाडी बसवले. नंतर तिला घरी सोडण्या ऐवजी एका जंगलात नेण्यात आले. आरोपींनी या महिलेनवर सामुहिक बलात्कार केला. बलात्कार करून तिचा खून केला. खून केल्यानंतर आरोपींनी पीडित महिलेचा मृतदेह एका विहरीत फेकून दिला.
इथे माहेरी ही महिला आली नाही म्हणून तिच्या घरचे चिंतेत होते. नंतर त्यांनी पोलिसांत महिला हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोध घेतला. महिलेच्या माहेरच्या १० किलोमीटर आधी या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही महिला या गाडीत बसली. त्यात एक १४ वर्षाचा मुलगाही होता. पोलिसांनी या मुलाचा शोध घेतला आणि चौकशी केली. तेव्हा त्याने कालुराम मीणाचे नाव सांगितले. तसेच आपण गाडीतून उतरल्याने आरोपी महिलेला घेऊन गेल्याचेही मुलाने सांगितले. 

त्यानंतर पोलिसांनी कालुराम मीणाचा शोध घेतला आणि त्याची चौकशी केली. तेव्हा कालुरामने आपला गुन्हा कबुल केला आणि मृतदेह कुठे फेकला याबाबत माहिती दिली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. महिला आणि आरोपीची बिल्कूल ओळख नव्हती असे पोलिसांनी स्पष्ट केले. कालुरामसोबत त्याचे आणखी साथीदारही होते. पोलिसांनी या त्याच्या साथीदारांचाही शोध घेण्यास सुरूवात केली आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी