Rajiv kumar होणार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त, 3 लाखांहून अधिक शेल कंपन्यांची बँक खाती फ्रीज करुन चर्चेत

appointment of the chief election commissioner : राजीव कुमार हे देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त असतील. न्याय आणि कायदा मंत्रालयाने गुरुवारी अधिसूचना जारी करून ही माहिती दिली. ते १५ मे रोजी सीईसी म्हणून पदभार स्वीकारतील.

Rajiv Kumar appointed as Chief Election Commissioner, will replace Sushil Chandra from May 15
Rajiv kumar होणार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त, 3 लाखांहून अधिक शेल कंपन्यांची बँक खाती फ्रीज करुन चर्चेत   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राजीव कुमार यांची भारत निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती
  • सुशील चंद्रा यांची जागा घेणार आहेत.
  • राजीव कुमार 15 मे रोजी पदभार स्वीकारतील.

नवी दिल्ली : राजीव कुमार हे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त असतील. राजीव कुमार यांच्या नियुक्तीबाबत कायदा मंत्रालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली आहे. राजीव कुमार हे देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त असतील. ते सुशील चंद्रा यांची जागा घेणार आहेत. राजीव कुमार 15 मे रोजी पदभार स्वीकारतील. (Rajiv Kumar appointed as Chief Election Commissioner, will replace Sushil Chandra from May 15)

अधिक वाचा : 

Gyanvapi Masjid Verdict: मुस्लीम पक्षाला 'जोर का झटका', 17 मेपर्यंत मशिदीच्या कोपऱ्याचं होणार सर्वेक्षण, निकाल येताच परिसरात घुमला हर हर महादेवचा नारा

1984 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी

राजीव कुमार हे 1984 च्या बॅचचे बिहार/झारखंड केडरचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत, जे फेब्रुवारी 2020 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले. राजीव कुमार 1 सप्टेंबर 2020 रोजी भारत निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून रुजू झाले. निवडणूक आयोगात पदभार स्वीकारण्यापूर्वी राजीव कुमार सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाचे अध्यक्ष होते. ते एप्रिल 2020 मध्ये पीईएसबी (सार्वजनिक उपक्रम निवड मंडळ) चे अध्यक्ष म्हणून रुजू झाले होते.

अधिक वाचा : 

मुस्लिम मुलीचे बोलणे ऐकून PM मोदी झाले भावूक

अत्यंत अनुभवी राजीव कुमार

राजीव कुमार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1960 रोजी झाला. त्यांनी B.Sc, LLB, PGDM आणि MA पब्लिक पॉलिसीमध्ये शैक्षणिक पदवी घेतली आहे. राजीव कुमार हे अत्यंत अनुभवी आहेत, त्यांना भारत सरकारची 36 वर्षांपेक्षा जास्त सेवा आहे. या काळात त्यांनी सामाजिक क्षेत्र, पर्यावरण आणि वन, मानव संसाधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्रात केंद्र आणि राज्याच्या विविध मंत्रालयांमध्ये काम केले आहे.

अधिक वाचा : 

Dispute over Taj Mahal: आज ताजमहल उद्या न्यायाधीशांच्या चेंबर पाहणार का; अलाहाबाद हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना झापले

3.38 लाख शेल कंपन्यांची बँक खाती गोठवली 

राजीव कुमार यांनी तीन लाखांहून अधिक शेल कंपन्यांवर कारवाई केली तेव्हा ते प्रसिद्धीच्या झोतात आले. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, राजीव कुमार यांनी वित्तीय सेवा क्षेत्रावर देखरेख केली. बँकिंग सेवा क्षेत्रात त्यांनी अनेक सुधारणा केल्या. बनावट इक्विटी तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सुमारे 3.38 लाख शेल कंपन्यांची बँक खाती त्यांनी गोठवली होती. राजीव कुमार यांनी केंद्रीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), SBI, NABARD वर संचालक म्हणूनही काम केले आहे. ते इकॉनॉमिक इंटेलिजन्स कौन्सिल (EIC) चे सदस्य आहेत, आर्थिक स्थिरता आणि विकास परिषद (FSDC) चे सदस्य आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी