[VIDEO] तेजसमधून उड्डाण करणारे देशाचे पहिले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज स्वदेशी निर्मित तेजस लढाऊ विमानातून उड्डाण केलं आहे. असं करणारे राजनाथ सिंह हे पहिले संरक्षणमंत्री ठरले आहेत.

Rajnath singh
VIDEO:तेजसमधून उड्डाण करणारे पहिले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज भारतीय बनावटीचं लढाऊ विमान (LCA) तेजसमधून उड्डाण घेतलं आहे.
  • आज सकाळी बंगळुरूमधील हिंदुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) विमानतळावरून हे उड्डाण केलं.
  • स्वदेशी निर्मित लढाऊ विमानात बसणारे राजनाथ सिंह हे पहिले संरक्षणमंत्री असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.  

बंगळुरूः संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज ( गुरूवार,19 सप्टेंबर) भारतीय बनावटीचं लढाऊ विमान (LCA) तेजसमधून उड्डाण घेतलं आहे. त्यांनी आज सकाळी बंगळुरूमधील हिंदुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) विमानतळावरून हे उड्डाण केलं. स्वदेशी निर्मित लढाऊ विमानात बसणारे राजनाथ सिंह हे पहिले संरक्षणमंत्री असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.  संरक्षणमंत्र्यांचं तेजसमधलं हे उड्डाण विमानाच्या विकासात संबंध असलेल्या अधिकाऱ्यांचं मनोबल वाढविण्यासाठी आहे. राजनाथ सिंग यांनी अर्धा तास या विमानात घालवला. 

संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, यामुळे या विमानानं उड्डाण करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांचं मनोबलही वाढेल.  वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी तेजसमध्ये उड्डाण करण्यापूर्वी संरक्षण मंत्र्यांना औपचारिक माहिती दिली. तेजस विमान तीन वर्षांपूर्वी हवाई दलात दाखल करण्यात आलं होतं. याचं अपग्रेड व्हर्जनही लवकरच येणार आहे. 

तेजस हे चौथे पिढीचं विमान आहे, जे भारतीय हवाई दलासाठी अनेक प्रकारे विशेष आहे. तेजस हे हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्रांचा मारा करण्याठी सक्षम आहे. यात बॉम्ब आणि रॉकेटही वापरण्याची सुविधा आहे. तेजस तसं सिंगल सीटर विमान आहे, मात्र याचा ट्रेनर व्हेरिएंट डबल सीटर आहे. एका वेळी हे विमान 54 हजार फूट उंचीवर उड्डाण करू शकते. 

तेजस या लढाऊ विमानाची निर्मिती हिंदुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)नं केली आहे. या विमानासाठी 45 हजार कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. 42 टक्के कार्बन फायबर, 43 टक्के अॅल्युमिनिअम आणि टायटेनिम या धातूपासून तेजसची बांधणी केली आहे. 

याला तेजस नाव माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनी दिलं होतं. संस्कृतच्या या शब्दाचा अर्थ होतो की, खूप शक्तिशाली ऊर्जा जो त्याच्या वैशिष्ट्यांद्वारे  प्रतिबिंबित होतो. हे विमान ताशी 2000 किलोमीटरहून अधिक वेगानं उड्डाण करू शकते, जेणेकरून एकावेळी सुमारे 3000 किलोमीटर अंतर व्यापू शकेल. हे सुमारे 13,500 किलो वजनाचे शस्त्र देखील ठेवू शकते. तसंच हे विमान जमिनीपासून 54 हजार उंचीपर्यंत उड्डाण करू शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...