Ram Mandir Construction: राम मंदिर निर्मितीच्या पहिल्या टप्प्यातील काम सुरू

लोकल ते ग्लोबल
Updated May 08, 2020 | 19:58 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Ram Mandir Construction news: अयोध्येतील राम मंदिर निर्माणच्या पहिल्या चरणाचं काम सुरू झालंय. ज्या ठिकाणी राम मंदिराचं निर्माण होणार आहे तिथं आता साफ-सफाईचं काम सुरू करण्यात आलंय.

Ram Mandir Trust
राम मंदिर निर्माणच्या पहिल्या चरणाचं काम सुरू (प्रातिनिधीक फोटो)  |  फोटो सौजन्य: PTI
थोडं पण कामाचं
  • राम मंदिर निर्माण ट्रस्टमध्ये १५ जणांचा समावेश, यात कुणीही सरकारी सदस्य नाही
  • राम मंदिर निर्माणच्या बाजूनं सुप्रीम कोर्टानं दिला होता निर्णय
  • मंदिरासोबतच बाबरी मस्जिद बनविण्यासाठीही योग्य जागा देण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

नवी दिल्ली: अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माण करण्यासाठीच्या पहिल्या चरणाचं काम सुरू झालेलं आहे. ज्या जागी भव्य राम मंदिर तयार होणार आहे, त्या जागेची स्वच्छता सुरू करण्यात आलीय. पहिल्या चरणामध्ये रामलल्लाची मूर्ती तात्पुरती बुलेट प्रूफ जागेत शिफ्ट केली गेली होती. विशेष बाब म्हणजे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूजा करून मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली होती.

तात्पुरत्या जागी आहे सध्या रामलल्लाची मूर्ती

रामलल्लाची मूर्ती जी आपल्या मूळ जागी स्थापन होती आणि जी सुरक्षेच्या दृष्टीनं लोखंडाच्या बॅरिकेटिंगमध्ये होती. ती आता तिथून हटविण्याचं काम सुरू आहे. विशेष म्हणजे कोरोना संकटाच्या काळात सोशल डिस्टेंसिंगची विशेष काळजी घेतली जात आहे. जेव्हा मंदिर निर्माणाच्या ठिकाणावरील सर्व बॅरिकेट्स हटवले जातील, त्यानंतर जमीन समांतर करण्याचं काम सुरू होईल. सध्या जिथं रामलल्लाची मूर्ती शिफ्ट केली गेलीय, त्याचं छत मजबूत करण्याचं काम सुरू केलंय.

प्रस्तावित नकाशानुसार होईल राम मंदिर

प्रस्तावित नकाशानुसार, अजून राम मंदिर बनविण्यासाठी २ लाख ६३ हजार घनफूट दगड लागेल. राम मंदिराच्या वरच्या भागात १०६ खांब असतील. प्रत्येक खांबावर १२ हिंदू देवी-देवतांच्या मूर्त्या साकारल्या जातील. पहिल्या मजल्यावर राम दरबार बनवला जाणार आहे. जिथं राम, लक्ष्मण आणि सीतेसह हनुमानाचीही मूर्ती असेल. राम मंदिरासोबतच आणखी पाच मंदिर बनवले जातील. ज्यात भरत, सीता, लक्ष्मण, हनुमान आणि गणेशाची मूर्ती असेल.

रामलल्ला नावाचे बँक खाते

सुप्रीम कोर्टानं दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर रामलल्लाला मंदिर बनविण्यासाठी रामलल्लाच्याच नावानं एक बँक अकाऊंट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडलं गेलं आहे. या खात्याच्या मदतीनं सामान्य नागरिक सुद्धा राम मंदिर निर्माण प्रक्रियेचा भाग बनू शकतात. देशभरातील भगवान श्रीरामचे भक्त आणि मंदिर निर्माणात मदत करू इच्छिणारे लोक या खात्यात आपल्या श्रद्धेनुसार रक्कम जमा करू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी