Pension and Facilities for Ex President: रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यांचा कार्यकाळ संपल्यावर त्यांचे निवासस्थान हे बदललं जाणार आहे. दिल्लीतील अत्यंत महत्त्वाचा बंगला १२ जनपथ या ठिकाणी त्यांचे निवासस्थान असू शकते. हा बंगला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या १० जनपथ या बंगल्याच्या शेजारीच आहे. म्हणजेच आपला राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यावर रामनाथ कोविंद हे सोनिया गांधी यांचे शेजारी बनतील. (Ram Nath kovind will be sonia gandhi neighbour see what facilities will get him after retirement)
यापूर्वी हा बंगला लोक जनशक्ती पक्षाचे नेते राम विलास पासवान यांच्याकडे होता. टाईप-९ बंगल्यात रामनाथ कोविंद यांना माजी राष्ट्रपती म्हणून अनेक सुविधा मिळतील. ज्या राष्ट्रपतींना वेतन आणि निवृत्ती वेतन (सुधारणा) अधिनियम २००८ अंतर्गत दिल्या जातात.
रामनाथ कोविंद हे निवृत्तीनंतर ज्या बंगल्यात राहणार आहेत तो टाईप-८ बंगला आहे. म्हणजेच त्या बंगल्यात ७ खोल्या आणि नोकरांसाठी एक क्वार्टर उपलब्ध असणार आहे. हा बंगला लोकजनशक्ती पक्षाचे नेते राम विलास पासवान यांच्याकडे यापूर्वी होता. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा चिराग पासवान राहत होता. मात्र, मार्च २०२२ मध्ये कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर हा बंगला रिकामा करण्यात आला. त्यानंतर हा बंगला रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव यांना देण्यात आला होता मात्र, ते या बंगल्यात शिफ्ट झाले नाहीत. आता हा बंगला रामनाथ कोविंद यांना अलॉट करण्यात आला आहे.
अधिक वाचा : सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना पाकिस्तानी नंबरवरुन धमकीचा मेसेज
हा बंगला रामनाथ कोविंद यांच्यासाठी अलॉट करण्याचा निर्णय घेतल्यावर त्याची पूर्ण डागडुजी करण्यात आली. तसेच त्यात काही बदल सुद्धा करण्यात आले. बंगल्याचं संपूर्ण नूतनीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
अधिक वाचा : 'त्या' घटनेनंतर फडणवीसांचा सूर बदलला!
The Presidents Emoluments and Pension (Amedment) Act, 2008 अंतर्गत, माजी राष्ट्रपतींना १.५ लाख रुपये पेन्शन मिळेल. २००८ च्या घटना दुरुस्तीपूर्वी माजी राष्ट्रपतींना ५० हजार रुपये पेन्शन मिळत होते. मात्र, सेवानिवृत्तीच्या वेळी किंवा कार्यालय सोडताना मिळणाऱ्या मानधनाच्या ५० टक्क्यांपर्यंत वेतनाची रक्कम असेल अशी तरतूद या दुरुस्तीमध्ये करण्यात आली होती.