Ramdas Athawale on Loudspeaker Controversy । नवी दिल्ली : महाराष्ट्रातून सुरू झालेला लाउडस्पीकरचा वाद (Loudspeaker Controversy) उत्तर प्रदेशासह देशभर पसरला आहे. दरम्यान आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्यास विरोध केला आहे. मशिदीतील लाऊडस्पीकर काढून नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होता कामा नये, असे त्यांनी म्हटले. मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्यास आमचा विरोध राहणार असल्याचे त्यांनी आणखी सांगितले. (Ramdas Athawale jumps into loudspeaker controversy He said that mosques will be protected).
अधिक वाचा : डायबिटीजच्या रूग्णांसाठी शुगर वाढणे ठरू शकते धोकादायक
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले की, जर एखाद्या मशिदीवरून लाऊडस्पीकर काढला तर त्यांच्या पक्षाचे लोक त्या मशिदीचे संरक्षण करतील. मौलाना यांना शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले. ते म्हणाले की, वादग्रस्त वक्तव्ये करून वाद निर्माण करू नये.
याआधीही रामदास आठवले यांनी लाऊडस्पीकर हटवण्याच्या विरोधात भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी आठवले यांनीही हनुमान चालीसा वाजवण्याच्या विरोधात नसल्याचे म्हटले होते. ते म्हणाले की, "मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याच्या राज ठाकरेंच्या मागणीला आमचा विरोध आहे. मुस्लीम समाजातील लोकांनाही या मुद्द्यावर धमकावू नये. हे सर्व संविधानाच्या विरोधात आहे. ते म्हणाले की, हिंदू आणि मुस्लिमांनी नेहमीच एकमेकांच्या सणाचा आदर केला असून अशा प्रकारच्या फुटीरतावादी धमक्या देऊन वातावरण बिघडवू नये.
अधिक वाचा : पुण्यावर सीएनजीची वक्रदृष्टी....झाला 2.20 रुपयांनी महाग
लक्षणीय बाब म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (MNS) राज ठाकरे यांनी २ एप्रिलच्या गुढीपाडव्याच्या सभेत मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरवण्याची मागणी केली होती. त्यानंतर देशातील राजकारणात लाऊडस्पीकरच्या वादाला सुरूवात झाली. राज ठाकरेंवर झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी ठाण्यातील उत्तर सभेत सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. ३ मे पर्यंत मशिदींमधून अजान देणारे लाऊडस्पीकर काढून टाकावेत अन्यथा मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवून उत्तर दिले जाईल. असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.