बलात्काराच्या दोषींना नपुंसक बनवणार, पाहा या राज्याने तयार केला हा कठोर कायदा

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 12, 2019 | 17:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rape convicted criminal get chemical castration: बलात्कारासारख्या भयंकर घटनांना चाप बसावा यासाठी एका राज्याने अतिशय कठोर असा कायदा तयार केला आहे.

punishment_for_rapist
बलात्काराच्या दोषींना नपुंसक बनवणार, पाहा या राज्याने तयार केला हा कठोर कायदा  |  फोटो सौजन्य: Getty Images

न्यूयॉर्क: देशभरात बलात्काराच्या अनेक भयंकर घटना अनेकदा समोर आल्या आहे. यामुळेच बलात्कारासारख्या कृत्याला तशीच भयंकर शिक्षा देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. दिवसेंदिवस या मागणीत वाढच होत आहे. याच प्रकरणी एका राज्याने या प्रकरणाकडे अतिशय गंभीरपणे पाहत एक कठोर कारवाई करण्याचा कायदा तयार केला आहे. पण हे राज्य काही भारतातील नाही तर अमेरिकेतील आहे. अमेरिकेच्या अलबामा या राज्याने बलात्काराच्या शिक्षेसाठी एक नवा कायदा तयार केला आहे. अमेरिकेच्या अलबामामध्ये बलात्काराविरोधात एका नवा कायदा तयार केला गेला आहे. ज्यामध्ये दोषींना नपुंसक बनवण्यात येणार आहे. यासाठी काही विशिष्ट अशा केमिकलचा वापर त्यांच्यावर केला जाणार आहे. या कायद्यानुसार अलबामामध्ये १३ वर्षाहून कमी वयाच्या मुलांवर बलात्कार करणाऱ्या दोषींना ही शिक्षा सुनावली जाणार आहे. दोषींना नपुंसक बनविण्यासाठी काही इंजेक्शन दिली जातील. 

दरम्यान, एका रिपोर्टनुसार, ज्या दोषींना ही शिक्षा असेल त्यांनाच इंजेक्शनचा खर्च देखील करावा लागणार आहे. जर दोषीने इंजेक्शनला नकार दिल्यास त्याची जेलमधून कधीही सुटका केली जाणार नाही. यासंबंधी कोर्टच निर्णय घेईल की, दोषींना कधी इंजेक्शन द्यायचं. अलबामा हे असा कायदा बनवणारं अमेरिकेतील सातवं राज्य बनलं आहे. जे बलात्कारातील दोषींना नपुंसक बनवण्याची शिक्षा सुनावतं. याआधी लुसियाना आणि फ्लोरिडा यासारख्या राज्यांमध्ये हा कायदा लागू करण्यात आला आहे. 

केमिकल कॅस्ट्रेक्शन म्हणजे काय? 

केमिकल कॅस्ट्रेक्शन ही ती प्रकिया आहे जी इंजेक्शन दिल्यानंतर व्यक्तीतील सेक्सची क्षमता अतिशय वेगाने कमी करते. पण असं असलं तरीही याचा परिणाम हा काही बऱ्याच दिवसापर्यंत राहत नाही. ट्रिटमेंट बंद झाल्यानंतर त्याचा परिणाम कमी-कमी होत जातो.

दरम्यान, गेल्या काही वर्षात भारतात निर्भया, कोपर्डी, कठुआ यासारख्या अनेक बलात्कारांच्या घटनेने संपूर्ण भारतीय समाज ढवळून निघाला होता. त्या-त्या वेळी यासंबंधी प्रचंड मोठी आंदोलनं देखील झाली होती. त्यामुळे अनेकदा बलात्कारसंबंधी कायद्यांमध्ये वेळोवेळी बदलही करण्यात आले. पण असं असलं तरीही बलात्काराचं प्रमाण अद्यापही काही कमी झालेलं नाही. यामुळे अनेकदा कठोरातील-कठोर शिक्षा ही बलात्कार दोषींना लागू व्हावी अशी मागणी केली जाते. पण अद्याप तरी तशी तरतूद करण्यात आलेली नाही. कायद्यात काही बदल नक्कीच करण्यात आले आहेत. पण यामुळे गुन्हेगार म्हणावी तशी दहशत देखील बसलेली नाही. त्यामुळेच आता अलबामाप्रमाणेच आपल्यकडेही असे काही कायदे केले जातील का? यावर चर्चा सुरु आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बलात्काराच्या दोषींना नपुंसक बनवणार, पाहा या राज्याने तयार केला हा कठोर कायदा Description: Rape convicted criminal get chemical castration: बलात्कारासारख्या भयंकर घटनांना चाप बसावा यासाठी एका राज्याने अतिशय कठोर असा कायदा तयार केला आहे.
Loading...
Loading...
Loading...