Ratan Tata यांच्या साधेपणाने पुन्हा जिंकली लोकांची मने, Nano तून पोहोचले हाॅटेल ताजवर

देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रतन टाटा नॅनो कारमधून बाहेर पडताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये रतन टाटा यांचा साधेपणा पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

Ratan Tata's simplicity won back the hearts of the people, from Nano to Hotel Taj
Ratan Tata यांच्या साधेपणाने पुन्हा जिंकली लोकांची मने, Nano तून पोहोचले हाॅटेल ताजवर ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रतन टाटा यांच्या साधेपणाचे अनेक किस्से
  • रतन टाटांनी केला नॅनोतून प्रवास
  • मुंबईतील हाॅटेल ताजवर पोहचले नॅनो कारमधून

मुंबई : रतन टाटा हे त्यांच्या साध्या राहणीसाठी ओळखले जातात. दरम्यान, रतन टाटा यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रतन टाटा त्यांच्या 'ड्रीम कार'मधून ताज हॉटेलमध्ये जात आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही विचार करायला भाग पडेल. (Ratan Tata's simplicity won back the hearts of the people, from Nano to Hotel Taj)

अधिक वाचा : 

Rajiv Gandhi Assassination case: सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधींच्या मारेकऱ्याला का सोडले, समजून घ्या त्याच्या मागची कहाणी

व्हिडिओमध्ये काय खास?

या व्हायरल व्हिडिओमध्ये रतन टाटा मुंबईत त्यांच्या ड्रीम कारमध्ये म्हणजेच नॅनोमध्ये सुरक्षा आणि अंगरक्षकांशिवाय फिरत आहेत. या व्हिडिओमध्ये दिग्गज उद्योगपती रतन टाटा हॉटेल ताजच्या बाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ बाबा खान नावाच्या स्थानिक व्यक्तीने बनवला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षेसाठी फक्त हॉटेलचे कर्मचारी होते.

अधिक वाचा : 

दिल्लीच्या नायब राज्यपालांनी दिला राजीनामा


इन्स्टाग्राम पेजवर व्हिडिओ शेअर 

व्हिडिओमध्ये रतन टाटा यांच्या साधेपणाने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. युजर्स व्हिडिओवर भरभरून कमेंट करत आहेत. एका यूजरने म्हटले आहे की, 'जेव्हा लोक रात्रंदिवस महागड्या गाड्यांची स्वप्ने पाहतात, तेव्हा हा उत्तम माणूस नॅनोमध्ये फिरत असतो.' हा व्हिडिओ फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी