Ravi Pujari: केसांना कलर करायला जात असताना झाली रवी पुजारीला अटक, २६ वर्ष देत होता गुंगारा

लोकल ते ग्लोबल
Updated Feb 25, 2020 | 16:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ravi Pujari under arrest: गँगस्टर रवी पुजारीला ताब्यात घेण्यात कर्नाटक पोलिसांना एका वर्षानंतर यश मिळालंय. जाणून घ्या कशाप्रकारे पोलिसांना देत होता रवी पुजारी गुंगारा...

Ravi Pujari
जाणून घ्या कशाप्रकारे अटक झाली गँगस्टर रवी पुजारीला  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • अँडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी तब्बल २६ वर्ष देत होता पोलिसांना गुंगारा
  • चार देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी राहून करत होता वेगवेगळे व्यवसाय
  • १९ जानेवारी २०१९ ला सेनेगलला पोलिसांनी केली अटक, फेब्रुवारी २०२०मध्ये आणलं गेलंय भारतात.

नवी दिल्ली: अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी आता भारताच्या ताब्यात आहे. कर्नाटक पोलीस त्याची चौकशी करत आहे आणि जी माहिती समोर येतेय ती अतिशय धक्कादायक आहे. रवी पुजारी मागील २६ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देक होता. मात्र २०१९ हे वर्ष त्याच्यासाठी जड गेलं. सेनेगल पोलिसांनी १९ जानेवारी २०१९ रोजी त्याला अटक केली, तेव्हा रवी पुजारी केसांना रंग द्यायला जात होता. जवळपास १ वर्षांनंतर सेनेगल सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्याला भारताकडे सुपूर्द करण्यात आलं. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या २६ वर्षांच्या काळात तो पाच देशांमध्ये चार वेगवेगळ्या नावांनी राहत होता. रवी पुजारीवर दबाव वाढू लागल्यानंतर तो १९९४ मध्ये भारत सोडून पळाला होता.

छोटा राजनचा खूप जवळचा होता रवी पुजारी

रवी पुजारी विरोधात अनेक गंभीर प्रकरणं दाखल झालेले होते. तो छोटा राजनच्या खूप जवळचा होता. जेव्हा पुजारीवर दबाव वाढला तेव्हा तो १९९४मध्ये पहिले नेपाळला पळाला आणि त्यानंतर बँकॉकला फरार झाला. पोलिसांचं म्हणणं आहे की, तो १९९४ पासून पुढची चार वर्ष धंदा करत होता. पुजारी मुंबईमध्ये अनेक गंभीर प्रकरणांमध्ये अडकलेला होता. तर १९९४ ते १९९८ दरम्यान पुजारी नेपाळहून आपले नापाक धंदे चालवत होता. मात्र पोलिसांच्या दबावानंतर त्यानं नेपाळहून सुद्धा पळ काढला आणि २००३ पर्यंत बँकॉकमध्ये राहिला होता.

चार वेळा रवी पुजारीनं बदललं आपलं नाव

पोलिसांचं म्हणणं आहे की, रवी पुजारीनं कसिनो आणि डान्स बारमध्ये खूप पैसा लावला होता. मात्र बँकॉकच्या स्थानिक माफियासोबत त्याचा वाद झाला, त्यानंतर त्याला तिथं व्यवसाय करणं कठीण झालं आणि आता आपल्यासाठी बँकॉक सुरक्षित नसल्याचं त्याला वाटलं म्हणून नंतर रवी पुजारी बँकॉकहून सुदानला पळाला. तिथं त्यानं कपड्याचा व्यवसाय सुरू केला. मात्र त्यात तोटा झाल्यामुळे कपड्याचा व्यवसाय त्याला बंद करावा लागला. त्यानंतर रवी पुजारी बुर्किना फासो इथं शिफ्ट झाला.

२६ वर्षांपर्यंत पोलिसांना दिला गुंगारा

पुजारीनं भारत सोडला होता. मात्र हत्या आणि वसुलीची कामं सुरू ठेवली होती. बुर्किना फासोमध्ये जेव्हा त्याला यश मिळालं नाही तेव्हा २०१५ मध्ये रवी पुजारी सेनेगलला पळून गेला. तिथं त्यानं महाराजा इंडियन रेस्टॉरंट सुरू केलं. सेनेगलमध्ये त्याचा व्यवसाय चांगला चालला. पोलिसांचं म्हणणं आहे की, त्याचं नाव रवी प्रकाश पुजारी होतं. अंडरवर्ल्ड गुरू छोटा राजन त्याला अँटनी फर्नांडिस बोलवत होता. काही काळानंतर रवी पुजारीनं आपलं नाव बदललं आणि टोनी फर्नांडिस ठेवलं. टोनी फर्नांडिस या नावानं तो नेपाळ, बँकॉक आणि सुदानमध्ये राहिला. बुर्किना फासोमध्ये आल्यानंतर त्यानं आपलं नाव रॉकी फर्नांडिस सांगितलं आणि याच नावानं त्यानं आपलं पासपोर्ट बनवलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी