परमबीर सिंह ४८ तासांत सर्वोच्च न्यायालयात हजर होणार

Ready to appear before CBI within 48 hours, ex-Mumbai Police chief Param Bir Singh tells Supreme Court सर्वोच्च न्यायालयाने परमबीर यांना अटकेपासून तात्पुरते संरक्षण देऊन सर्वोच्च न्यायालयात ४८ तासांत हजर होण्यास सांगितले. तसेच तपासाला पूर्ण सहकार्य करा, असा आदेश दिला. 

Ready to appear before CBI within 48 hours, ex-Mumbai Police chief Param Bir Singh tells Supreme Court
परमबीर सिंह ४८ तासांत सर्वोच्च न्यायालयात हजर होणार 
थोडं पण कामाचं
  • परमबीर सिंह ४८ तासांत सर्वोच्च न्यायालयात हजर होणार
  • सर्वोच्च न्यायालयाने परमबीर यांना अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले
  • तपासाला पूर्ण सहकार्य करा, परमबीर यांना सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Ready to appear before CBI within 48 hours, ex-Mumbai Police chief Param Bir Singh tells Supreme Court नवी दिल्ली: महाराष्ट्रात माझ्या जिवाला धोका आहे. यामुळेच मी लपून बसलो आहे. पण भारताबाहेर नाही. अटकेपासून संरक्षण दिले तर सर्वोच्च न्यायालयात हजर होईन, अशी ग्वाही मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी वकिलाच्या माध्यमातून दिली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने परमबीर यांना अटकेपासून तात्पुरते संरक्षण देऊन सर्वोच्च न्यायालयात ४८ तासांत हजर होण्यास सांगितले. तसेच तपासाला पूर्ण सहकार्य करा, असा आदेश दिला. 

याआधी खंडणी वसुलीचा आरोप ठेवून मुंबई पोलिसांनी परमबीर सिंह यांना फरार जाहीर करण्याची मागणी केली. मुंबईच्या मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने मुंबई पोलिसांचा अर्ज स्वीकारुन परमबीर सिंह यांना फरार जाहीर केले. यानंतर थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागून परमबीर यांनी अटकेपासून संरक्षण मागितले. सर्वोच्च न्यायालयाने आधी अशिलाचा ठावठिकाणा जाहीर करा नंतर अटकेपासून संरक्षण देण्याच्या मागणीचा विचार करू, असे परमबीर यांच्या वकिलाला सुनावले. यानंतर परमबीर यांनी वकिलामार्फत भारतातच असल्याचे सर्वोच्च न्यायालयाला कळवले.

परमबीर यांनी सर्वोच्च न्यायालयात हजर होण्याची तयारी दाखवली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने परमबीर यांना अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले. पुढील ४८ तासांत सर्वोच्च न्यायालयात हजर व्हा आणि तपासाला पूर्ण सहकार्य करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.

मुंबई पोलिसांनी पाच प्रकरणांमध्ये परमबीर यांच्यावर खंडणीचा आरोप केला आहे. तर महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनीच खंडणी वसुलीचे आदेश दिल्याचे आरोप परमबीर यांनी पत्राद्वारे काही महिन्यांपूर्वी केले. सचिन वाझे याच्याकडे १०० कोटींच्या खंडणी वसुलीचे टार्गेट देशमुखांनीच दिल्याचा आरोप परमबीर यांनी केला आहे. 

सध्या अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीत तर सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या कोठडीत आहे. यामुळे परमबीर सिंह सर्वोच्च न्यायालयात हजर झाल्यानंतर खंडणी प्रकरणात आणखी नवे गौप्यस्फोट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी