'कायदे परत घेतल्यानंतर चालू होणार खरी लढाई', जाणून घ्या कोण आहे ग्रेटाचे टूलकिट बनवणारी व्यक्ती

लोकल ते ग्लोबल
Updated Feb 06, 2021 | 13:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गचे टूलकिट तयार करण्याचा संशय पोएटिक जस्टिस फाऊंडेशनवर व्यक्त केला आहे. या संस्थेच्या संस्थापकाचे नाव एम. धालीवाल आहे ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

M. Dhaliwal and Greta Thunberg
'कायदे परत घेतल्यानंतर चालू होणार खरी लढाई', जाणून घ्या कोण आहे ग्रेटाचे टूलकिट बनवणारी व्यक्ती 

थोडं पण कामाचं

  • ग्रेटाचे टूलकिट तयार करणाऱ्या खलिस्तान्याचा व्हिडिओ व्हायरल
  • टूलकिट बनवण्याचा संशय पोएटिक जस्टिस फाऊंडेशनवर
  • कॅनडाच्या या संस्थेचा संस्थापक खलिस्तानी एम. ओ. धालीवाल

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांनी (Delhi police) पर्यावरण कार्यकर्ती (environmental activist) ग्रेटा थनबर्गने (Greta Thunberg) ट्वीट (tweet) केलेल्या एका कागदपत्राबाबत (document) प्राथमिक खटला दाखल करून तपास (investigation) चालू केला आहे. मात्र यादरम्यान सोशल मीडियावर (social media) एक व्हिडिओ (video) व्हायरल (viral) होत आहे ज्यात मूळचा कॅनडाचा (Canada) असलेला एम. ओ. धारीवाल आहे. पोएटिक जस्टिस फाऊंडेशन नावाच्या संस्थेचा तो संस्थापक आहे आणि त्याच्यावर ग्रेटाचे टूलकिट बनवण्याचा संशय आहे. शेतकरी आंदोलनाचा फायदा घेत भारतात खलिस्तानी आंदोलनाला हवा देण्याचा प्रयत्न तो करत असल्याचा आरोप आता केला जात आहे.

व्हायरल झाला व्हिडिओ

वैंकूवरमध्ये भारतीय वाणिज्य दूतावासाच्या समोर 26 जानेवारी रोजी आंदोलन करताना धालीवाल यांनी एक चिथावणीखोर भाषण केले होते ज्यात त्याने भारताविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये केली होती आणि म्हटले होते, 'जर शेतकरी कायदे परत घेतले गेले तरी तिथे आमचा विजय होणार नाही. कृषी कायदे परत घेतल्यानंतर संघर्षाची सुरुवात होईल, शेवट नाही. ही लढाई शेतकरी कायदे मागे घेतल्यावर संपेल असे कुणालाही तुम्हाला सांगू देऊ नका, कारण ते या आंदोलनातली ऊर्जा संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की आपण पंजाबपासून वेगळे आहात आणि आपण खलिस्तान आंदोलनापासून वेगळे आहात, पण आपण वेगळे नाही आहात.'

कोण आहे धालीवाल?

धालीवाल पोएटिक जस्टिस फाऊंडेशनशी संबंधित आहे ज्याने ग्रेटाचे विवादास्पद टूलकिट तयार केल्याचा आरोप होत आहे ज्याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत. कॅनडाच्या या संस्थेच्या ‘आस्क इंडिया’ या संकेतस्थळावर शेतकऱ्यांशी आणि शेतकरी आंदोलनाशी संबंधित भरपूर मजकूर आहे आणि त्यांच्या सोशल मीडिया साईट्सवरही तथाकथित भारतविरोधी आणि खलिस्तानचे समर्थन करणारी सामग्री आहे. आपल्या एका फेसबुक पोस्टमध्ये धालीवाल यांनी म्हटले आहे की संस्थेची स्थापना त्याची मैत्रीण अनीता लालने केली आहे. धालीवालने 2011मध्ये वैंकूवरमध्ये स्थापित एका डिजिटल ब्रँडिंग रचनात्मक एजन्सी स्कायट्रॅकचा सहसंस्थापक आणि प्रमुख आहे.

काय होते टूलकिटमध्ये?

ग्रेटा थनबर्गने ट्वीट केलेल्या टूलकिटचे लक्ष्य भारत सरकारविरोधात सामाजिक, सांस्कृतिक आणिआर्थिक युद्ध छेडण्याचे असल्याचे आरोप सध्या होत आहेत. सध्या शेतकरी आंदोलनावरून भाष्य करणाऱ्या परदेशातील तारेतारकांना लक्ष्य केले जात आहे. यात रियाना आणि ग्रेटा थनबर्गचा समावेश आहे. भारतीय सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहाने यात सहभागी होत आहेत. याच प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ग्रेटा थनबर्गविरोधात केस दाखल केली आहे आणि आता याचा संबंध खलिस्तानी आंदोलनाशी जोडून पाहिला जात आहे. यातली सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी