प्रियकराच्या भावाशी संबंध, दत्तक मुलीने केली आई-वडिलांची हत्या, लष्करी जवान प्रियकर बनला मास्टरमाइंड

कानपूरमधील आयुध निर्माणीतील पर्यवेक्षक मुन्नालाल आणि त्यांच्या पत्नीच्या हत्येचा खुलासा पोलिसांनी केला आहे. दोघांची हत्या त्यांच्या २४ वर्षीय दत्तक मुलीने केली होती. या हत्येमध्ये त्याला प्रियकराच्या भावाची साथ होती. प्रेमी लष्करात असून मुंबईत तैनात आहे.

Relationship with boyfriend's brother, adopted daughter kills parents, military soldier boyfriend becomes mastermind
प्रियकराच्या भावाशी संबंध, दत्तक मुलीने केली आई-वडिलांची हत्या, लष्करी जवान प्रियकर बनला मास्टरमाइंड  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दत्तक घेतलेली मुलगीने संपूर्ण कुटुंब संपवले
  • प्रियकराच्या मदतीने आई-वडिलांची हत्या
  • लष्कराचा जवान आणि त्याचा भाऊ मास्टरमाइंड आहे

Kanpur double murder : कानपूरमधील ईडब्ल्यूएस कॉलनीत 61 वर्षीय मुन्नालाल, त्यांची ५५ वर्षीय पत्नी राजदेवी, मुलगी कोमल आणि मुलगा अनूप राहतात. सोमवारी सकाळी मुन्नालाल आणि त्यांची पत्नी राजदेवी यांची घरातच हत्या करण्यात आली. सुरुवातीला मुलीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. (Relationship with boyfriend's brother, adopted daughter kills parents, military soldier boyfriend becomes mastermind)

अधिक वाचा : बोरिस जॉन्सन राजीनामा देणार, हंगामी पंतप्रधान होणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्नालाल आणि राजदेवी या दाम्पत्याला एकुलता एक मुलगा होता. त्यांना मुलगी हवी होती, पण त्याला दुसरे मूल होऊ शकले नाही. म्हणून त्यांनी आपला भाऊ रामकुमार यांची मुलगी कोमलला दत्तक घेतले. तिचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, कोमल फतेहपूर जिल्ह्यातील शाहजहांपूर गावात राहणाऱ्या राहुल उत्तमच्या प्रेमात पडली. तो लष्करात असून मुंबईत तैनात आहे.

अधिक वाचा : पाकिस्तानची महिला भारतीयाशी लग्न करण्यासाठी जालंधरमध्ये दाखल

मुन्नालाल यांची मोठी संपत्ती होती. या संपत्तीची कोमलला मालकीण व्हायचे होते. कोमलला वाटत होते की, तिघांचीही हत्या केल्यानंतर लग्न करेल. यानंतर ती तिच्या प्रियकरासह सुखात राहील. कोमलने राहुलसोबत हत्येचा प्लॅन बनवला. कोमल तिच्या आई-वडिलांची हत्या करून तिच्या भाऊ अनूपला त्यात गोवाण्याचा प्लॅन रचला. 

यासाठी तिने प्रियकराचा भाऊ रोहितला सामील करून घेतले. त्याचे क्रिमिनल बॅकग्राऊंड होते. यासाठी तिने हत्येच्या आदल्या दिवशी रोहितसोबत शारीरिक संबंध ठेवले. हत्येच्या रात्री कोमलने आई-वडील आणि भाऊ अनूप यांच्या नशेचा ज्यूस पाजला. त्यामुळे आई आणि वडिल बेशुध्द झाल्यानंतर रात्री उशिरा 12:54 च्या सुमारास प्रियकराचा भाऊ रोहित घरात घुसला. कोमल आणि रोहित या दोघांनी मिळून खून केला.

प्लॅनिंगनुसार आई-वडिलांची हत्या केल्यानंतर भावाला झोपेच्या अवस्थेत फासावर लटकवायचे होते, जेणेकरून त्याने खूनानंतर आत्महत्या केल्यासारखे वाटेल. पण अनूपने रात्री संपूर्ण ज्यूस प्यायला नव्हता. ज्यूस प्यायल्यानंतर त्याला उलटी झाली. यामुळे तो बेशुद्ध झाला नाही, फक्त तो गाढ झोपेत होता त्याला काही करावे तर तो लगेच जागा होऊन आरडाओरडा करेल म्हणून प्लॅन बदलला आणि त्याला सोडून दिले. सुमारे दीड तासात दुहेरी हत्याकांड केल्यानंतर रोहित अडीचच्या सुमारास तेथून निघून गेला.

अधिक वाचा : पाच लाख रुपयांच्या वसुलीसाठी तरुणीचा बलात्काराचा बनाव; आरोपी महिलेसह तीन वकिलांना अटक

दुसऱ्या दिवशी घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस तपासात कोमलने तिघांना पळताना पाहिल्याचा जबाब दिले. मात्र सीसीटीव्हीमध्ये एक व्यक्ती ये-जा करताना पोलिसांना दिसली. इथून शंका कोमलकडे वळली. चौकशीदरम्यान मुंबईत तैनात असलेल्या लष्करातील जवान राहुलसोबत प्रेमसंबंध उघडकीस आले. दुहेरी हत्याकांडाची योजना राहुलनेच रचली होती. त्या रात्री त्याने भाऊ रोहितला कोमलच्या घरी पाठवले होते, हे स्पष्ट झाले.

अधिक वाचा : कोरोना काळात प्रचंड कमाई करणाऱ्या 'डोलो-६५०'च्या निर्मात्या मायक्रो लॅबच्या ऑफिसवर इन्कम टॅक्सची धाड

दुहेरी हत्याकांडाचा तपास करताना पोलिसांनी शास्त्रीय पुरावे गोळा केल्यावर पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने बेन्झाडियन टेस्ट करून घेतली. चाचणीत कोमलच्या कपड्यांवर आणि शरीरावर रक्त असल्याची पुष्टी झाली आणि तिच्या अंतर्वस्त्रावर वीर्य असल्याचे आढळून आले. कोमलने चौकशीदरम्यान सांगितले की, तिने तिचा प्रियकर राहुलचा भाऊ रोहितसोबत मिळून ही हत्या केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी