Republic Day 2020: राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण, राजपथावर शानदार पथसंचलन

Republic Day 2020 Parade, Tableau, 26 January Celebration LIV भारताच्या ७१व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजधानी दिल्लीतील राजपथवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं

republic day 2020 a unique view will be seen on rajpath there will be a grand display of military to social progress
Republic Day 2020: जगाला दिसणार आज भारताची ताकद, थोड्याच वेळात राजपथावर पथसंचलन   |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली: आज संपूर्ण देशात  ७१वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. राजधानी दिल्लीत होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी हजारो सशस्त्र कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. यंदा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सनारो हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली. याच वेळी २१ तोफांची देखील सलामी देण्यात आली. यानंतर राजपथवर भव्य परेड सुरु झाली. ती  पाहण्यासाठी हजारो जण उपस्थित होते. राजपथ ते लाल किला या आठ किलोमीटर लांबीच्या परेड मार्गावर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. इथे काही ठिकाणी शार्पशूटर्स आणि स्नायपर्स तैनात करण्यात आले आहेत.

पाहा राजपथावरील पथसंचलन LIVE:

लष्कराची ताकद आणि सांस्कृतिक वारशाचे भव्य प्रदर्शन 

राजपथ येथील परेडमध्ये उपग्रह छेदन करणारी शस्त्रे, पायदळातील लढाऊ रणगाडे, आणि नुकतेच भारतीय हवाई दलात सामील झालेल्या चिनूक आणि अपाचे या लढाऊ हेलिकॉप्टर्सचा समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय देशातील मौल्यवान सांस्कृतिक वारसा आणि आर्थिक प्रगती दर्शविणारे चित्ररथ यावेळी राजपथावर पाहायला मिळाले. यावेळी २२ पैकी १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि ६ वेगवेगळे मंत्रालये आणि विभागाचे चित्ररथांचं पथसंचलन करण्यात आलं. 

 

 

 

पंतप्रधान मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमर जवान ज्योतीच्या ऐवजी राष्ट्रीय युद्ध स्मारकात शहीदांना श्रद्धांजली वाहिली. या दरम्यान तीन लष्कर प्रमुखांव्यतिरिक्त सीडीएस जनरल रावतही हजर होती. राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर २१ तोफांची सलामी देऊन राष्ट्रगीत झालं.. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सलामी देऊन परेडची सुरूवात झाली. परेडचं नेतृत्त्व दिल्ली विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट असित मिस्त्री यांच्याकडे होतं.

 

 

कडक सुरक्षा व्यवस्था

सुरक्षेसाठी शेकडो सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले असून ड्रोनने देखील नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच दिल्ली पोलिसांचे पाच ते सहा हजार पोलीस देखील तैनात असणार आहेत. याशिवाय निमलष्करी दलाच्या ५० हजार तुकड्या तैनात केल्या आहेत. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुका लक्षात घेता पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी