Republic Day 2021: प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

Whatsapp Quotes on Republic Day 2021: भारताचा प्रजासत्ताक दिन हा अतिशय महत्वाचा दिवस आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने आपण प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आणि पुढील मेसेज पाठवू शकता

Republic Day 2021 wishes
प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज  |  फोटो सौजन्य: Twitter

Republic Day 2021 whatsApp Marathi wishes and Messages: स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे २६ जानेवारी. कारण याच दिवशी भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला होता. (Republic Day 2021) कोरोना संकटामुळे २०२० या वर्षात आपल्याला अनेक सण साजरे करता आले नाही. सध्या कोरोनाची तीव्रता कमी झालेली आहे. पण असं असलं तरीही आपल्या सर्वांना सजग राहूनच प्रजासत्ताक दिन साजरा करावा  लागणार आहे. त्यामुळे आपल्याला काही नियम नक्कीच पाळावे लागणार आहेत. कोरोना संकट असल्यामुळे अद्यापही आपण एकत्र येणं शक्यतो टाळलं पाहिजे. पण असं असलं तरीही डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण प्रजासत्ताक दिन  साजरा करु शकतो आणि एकमेकांना शुभेच्छा देऊ शकतो. 

प्रजासत्ताक दिन (Republic Day) हा दिवस २६ जानेवारी १९५० या महत्वपूर्ण दिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ज्यादिवशी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट १९३५ मागे टाकून भारताचे संविधान (Indian constitution) देशाने स्वीकारले (adopted) होते. भारताने ब्रिटिश राजवटीपासून (British governance) स्वातंत्र्य हे १९४७ सालीच इंडियन इंडिपेंडेन्स अॅक्ट 1947नुसार मिळवले, मात्र १९५० सालापर्यंत भारत हा एक सार्वभौम राष्ट्र (sovereign state) बनलेला नव्हता. याचसाठी प्रजासत्ताक दिन हा भारतीय संविधान लागू झाल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

प्रजासत्ताक दिन हा भारताच्या संविधानाचे महत्व अधोरेखित करतो. त्यामुळे हा दिवस संपूर्ण देशात उत्साहाने साजरा केला जातो. या दिवसाचे सर्व मुख्य कार्यक्रम हे देशाची राजधानी दिल्लीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत साजरे केले जातात. राजपथावर भारताचा आणि त्याच्या विविधतेच्या गौरवार्थ एका भव्य पथसंचलनाचे आयोजन केले जाते. याशिवाय प्रत्येक राज्यातही प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पुरस्कार वितरण हाही या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग असतो. भारताचे राष्ट्रपती यादिवशी पद्म पुरस्कारांचे वितरण करतात. यात पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांचा समावेश असतो.

सध्या कोरोना संसर्ग असल्यामुळे नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात प्रजासत्ताक दिन आपल्याला साजरा करता येणार नाही. पण आपण आपला उत्साह अजिबात कमी होऊ देऊ नका. कोरोना संसर्गामुळे आपण एकत्र येऊ शकलो नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा नातेवाईकांना आणि मित्र-मंडळींना देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत. आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (Republic Day 2021 wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.  

द्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2021) खास शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

भारत देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रजसत्ताक दिन चिरायू होवो...

प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राला नमन, जगातील सर्वांत सुंदर संविधानाला नमन!

प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा... 
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

एकता ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. एकत्र येऊनच  आपण देशाला एक अधिक मजबूत प्रजासत्ताक बनवू शकतो. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

सुजलाम सुफलाम, मलयज शीतलाम,
शस्य श्यामलाम मातरम....
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो...

प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी