Republic Day Parade 2022: प्रजासत्ताक दिनाच्या परेडची तिकिट कुठे आणि कितीला मिळते? ऑनलाईन परेड कुठे बघू शकता? जाणून घ्या सविस्तर

Republic Day Parade 2022 उद्या २६ जानेवारी आहे. भारत आपला ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. १९५० साली याच दिवशी भारतात संविधान लागू झाले होते. राजधानी दिल्लीत राजपथावर परेड होते. ही परेड आपण प्रत्यक्ष पाहू शकता तसेच या परेडचे थेट प्रक्षेपणही विविध वाहिन्या आणि सोशल प्लॅटफॉर्मवर पहायला मिळतील. तर जाणून घेऊया प्रजासत्ताक दिनी होणार्‍या परेडबद्दल.

Republic Day Parade 2022 tickets and Know where and how to watch? See Livestream and registration details in marathi
प्रजासत्ताक दिनाची ऑनलाईन परेड कुठे बघु शकता? वाचा सविस्तर 
थोडं पण कामाचं
  • उद्या २६ जानेवारी.
  • भारत आपला ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.
  • १९५० साली याच दिवशी भारतात संविधान लागू झाले होते.

Republic Day Parade 2022 : नवी दिल्ली:  उद्या २६ जानेवारी आहे. भारत आपला ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. १९५० साली याच दिवशी भारतात संविधान लागू केले होते.  राजधानी दिल्लीत राजपथावर परेड होते. ही परेड आपण प्रत्यक्ष पाहू शकता तसेच या परेडचे थेट प्रक्षेपणही विविध वाहिन्या आणि सोशल प्लॅटफॉर्मवर पहायला मिळतील. तर जाणून घेऊया प्रजासत्ताक दिनी होणार्‍या परेडबद्दल.

अधिक वाचा : ​Full list of Maharashtra Police medal : महाराष्ट्राला 51 ‘पोलीस पदक  

प्रजासत्ताक दिन २०२२ च्या परेडची वेळ

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत परेडचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारताच्या राष्ट्रपतींकडून भारताचा ध्वज फडकावल्यानंतर ही परेड सुरू होते. त्यानंतर सैन्य, नौदल आणि हवाई दलाचे रेजिमेंट्स आपेल बँड घेऊन राष्ट्रपती भवन, राजपथ, इंडिया गेट आणि लाल किल्यापर्यंत जातात. सकाळी १० वाजता परेड सुरू होते. 

कुठे मिळेल तिकीट

प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या सेना भवन (गेट क्रमाकं -२) शास्त्री भवन (गेट क्रमाकं -३) प्रगती मैदान, जंतर मंतर (मुख्य प्रवेशद्वार), जामनगर हाउस, इंडिया गेट, लाल किल्ला (जैन मंदिर आणि १५ ऑगस्ट पार्क) इथून तुम्हाला तिकीट मिळू शक्तात. सकाळी १० वाजल्यापासून ते १२.३० पर्यंत तिकीट मिळेल. तसेच दुपारी २ वाजेपर्यंत प्रेक्षकांना तिकीट मिळेल तिकीट विकत घेण्याची आजचा शेवटचा दिवस आहे. सेना भवनमध्ये संध्याकाळी सात वाजेपर्यंत तिकीट विक्री सुरू असणार आहे. 

अधिक वाचा : ​ Happy Republic Day 2022 Messages: खास मराठी HD Greetings, Wallpapers, Whatsapp Status च्या माध्यमातून, महान नेत्यांचे Quotes शेअर करून द्या प्रजासत्ताक दिन शुभेच्छा

तिकीटाची किंमत

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच परेडमध्ये प्रवेश असणार आहे. लसीकरणाचे प्रमाणपत्र तसेच मतदनाचे ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा आधार कार्ड दाखवणे अनिवार्य आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार नागरिकांना २० रुपयांपासून ५०० रुपयांत तिकीट मिळेल. २०, १०० आणि ५०० रुपयाची तिकीट नागरिकांना तिकीट खिडकीवर मिळेल.

अधिक वाचा : ​ प्रजासत्ताक दिनाच्या परेड तालीममध्ये वाजली 'ही' धून, नेव्हीच्या जवानांनी राजपथावर धरला ठेका


प्रजासत्ताक दिनाची परेड कुठे पाहू शकता?

प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे थेट प्रक्षेपण अनेक वृत्तवाहिन्यांवर दाखवले जाते. प्रेक्षक ही परेड संरक्षण मंत्रालयाच्या युट्युब चॅनेलवरही पाहू शकतात. तसेच दूरदर्शनकडे या परेडचे प्रक्षेपण दाखवण्याचे हक्क आहेत. पीआयबी आणि सरकारच्या अनेक सोशल प्लॅटफॉर्मवरही परेडचे थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. 

या ठिकाणी पहा लाइव्ह परेड 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी