Republic Day Parade Timing: २६ जानेवारी २०२२ला भारत आपला ७३वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. देशात दरवर्षी या दिवशी राजपथावर प्रजासत्ताक दिनाची परेड (Republic Day Parade) आयोजित केली जाते. मात्र या वेळेस प्रजासत्ताक दिनाची परेड निर्धारित वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने सुरू होत आहे. ७५ वर्षात पहिल्यांदा ही परेड उशिराने सुरू होत आहे. कोरोना प्रोटोकॉल(corona protocol) आणि श्रद्धांजली सभा यांच्यामुळे प्रजासत्ताक दिनाची परेड सुरू होण्यास उशीर होईल. आधी जम्मू-काश्मीरमध्ये प्राण गमावलेल्या जवानांना श्रद्धांजली दिली जाणार आहे. Republic day parade will start late by 30 minutes in 75 years of history
परेड एकूण ९० मिनिटांची असते. दरवर्षी २६ जानेवारीला सकाळी १० वाजता राजपथावर ही परेड सुरू होते. मात्र यावेळेस ही परेड १०.३० वाजता सुरू होत आहे. ही परेड ८ किमीची असणार आहे. परेड रायसीना हिल येथून सुरू होऊन राजपथ, इंडिया गेट येथून लाल किल्ल्यावर संपणार आहे. परेडच्या सुरूवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, इंडिया गेटवर अमर जवान ज्योती आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकावर माल्यार्पण करून शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतील.
राष्ट्रीय राजधानीत प्रजासत्ताक दिनाच्या आधी दिल्ली पोलिसांनी राजपथ आणि त्यांच्या आजूबाजूची सुरक्षा वाढवली आहे. साधारण ३०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आले आहेत. तसेच चेहऱ्यांची ओळख करणाऱी सिस्टीमही लावण्यात आली आहे. या सिस्टीममध्ये ५० हजार संशयित गुन्हेगारांचे डेटाबेस आहेत. कोरोनाच्या प्रतिबंधामुळे केवळ ४ हजार तिकीटे उपलब्ध असणार आहेत तर एकूण २४ हजार लोकांना या सोहळ्यातत सामील होण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवानिमित्त या वर्षी राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये एकूण ७५ विमानांसह आतापर्यंतचा सगळ्यात भव्यदिव्य फ्लायपास्ट असेल. वायुसेनेचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर इंद्रनील नंदी म्हणाले, या वर्षाचा फ्लायपास्ट भव्यदिव्य असेल. यावेळी भारताचे वायुदल, नौदल आणि भूदलाची ७५ विमाने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी उड्डाण करतील.