जगातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश

Republic of Molossia or Molossia smallest country in the world : अमेरिकेतील नेवाडा (Nevada) प्रांतात कार्सन सिटीपासून ३० मिनिटांत कारने जाता येईल एवढ्या अंतरावर मोलोसिया नावाचा एक देश आहे. हा जगातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश आहे.

Republic of Molossia or Molossia smallest country in the world
जगातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • जगातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश
  • मोलोसिया नावाचा एक देश
  • ३० नागरिक आणि चार कुत्रे ही देशाची लोकसंख्या

Republic of Molossia or Molossia smallest country in the world : अमेरिकेतील नेवाडा (Nevada) प्रांतात कार्सन सिटीपासून ३० मिनिटांत कारने जाता येईल एवढ्या अंतरावर मोलोसिया नावाचा एक देश आहे. हा जगातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश आहे. जेमतेम १.२८ एकर भूभाग असलेल्या या छोट्या देशात फक्त ३० नागरिक आणि चार कुत्रे वास्तव्य करून आहेत. केविन बॉग हे या देशाचे सर्वोच्च नेते आहेत. 

बाप-लेकीची कमाल !, भारतीय वायुसेनेच्या इतिहासात प्रथमच वडील आणि मुलीने उडवले फायटर जेट

मोलोसिया देशात इंग्रजी, एस्पेरांतो आणि स्पॅनिश या तीन भाषा प्रामुख्याने बोलल्या जातात. या देशात प्रवेश करण्यासाठी सरकारची परवानगी अत्यावश्यक आहे. विशिष्ट कालावधीसाठी देशात येण्याची परवानगी दिली जाते. मुदत संपण्याआधी संबंधित व्यक्तीने देशातून बाहेर पडणे अपेक्षित आहे. या संदर्भातील माहिती मोलोसियाच्या एका सरकारी वेबसाईटवर दिली जाते.

United Nations: लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रह्मण्यम दक्षिण सुदानमध्ये शांती सेनेचे कमांडर

मोलोसिया देशाची स्वतःची सरकारी यंत्रणा आहे. देशाच्या सीमा निश्चित केल्या आहेत. देशात कायदा-सुव्यवस्था आहे. उत्तम अशी बँकिंग व्यवस्था आहे. देशाच्या रक्षणासाठी सैनिकांची व्यवस्था आहे. या देशात व्हॅलोरा नावाचे चलन वापरले जाते. देशात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना मोलोसियाच्या मध्यवर्ती बँकेतून व्हॅलोरा चलन दिले जाते. यासाठी मध्यवर्ती बँकेत चलन विनिमयाची व्यवस्था (करन्सी एक्सचेंज सिस्टिम) कार्यरत आहे. 

'काली' डॉक्युमेंट्री पोस्टर वाद, कॅनडाच्या संग्रहालयाने मागितली माफी, नाही दाखवणार डॉक्युमेंट्री

मोलोसिया देशाची स्थापना २६ मे १९७७ मध्ये झाली. सुरुवातीला ग्रँड रिपब्लिक ऑफ वर्ल्डस्टीन असे देशाचे नाव होते. नंतर १९९८ मध्ये देशाचे नाव मोलोसिया असे करण्यात आले. पण या देशाला अद्याप संयुक्त राष्ट्रांची तसेच अमेरिकेसह कोणत्याही देशाची मान्यता मिळालेली नाही. यामुळे मोलोसिया या देशाने कोणत्याही देशात स्वतःचा दूतावास सुरू केलेला नाही तसेच कोणत्याही देशाचा दूतावास मोलोसियामध्ये नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी