Corona vaccine: ५५ लाख खर्च करून कोरोना लस घेण्यासाठी दुबईत जातायत भारतातील श्रीमंत

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 19, 2021 | 14:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

दुबईचा रेसिडेंट व्हिसा असलेले श्रीमंत भारतीय कोरोना लस घेण्यासाठी दुबईला पसंती देत आहेत. हा ट्रेंड मार्चमध्ये सुरू झाला जेव्हा दुबईने रेसिडेंट व्हिसाधारकांसाठी लसीसाठी रजिस्टर करण्यास परवानगी दिली आहे.

corona vaccine
५५ लाख खर्च करून कोरोना लशीसाठी दुबईत जातायत भारतीय 

थोडं पण कामाचं

  • भारतातील श्रीमंत कोरोना लसीसाठी दुबईला जात आहेत
  • चार्टर्ड फ्लाईटने प्रत्येक व्यक्तीचा खर्च ५५ लाख रूपयांपर्यंत आहे.
  • यूएईमध्ये लोकांना मोफत दिली जात आहे कोरोना लस

मुंबई:भारतातील श्रीमंत व्यक्ती कोरोना लस(corona vaccine)घेण्यासाठी चार्टर्ड फ्लाईटने(charterd flight) दुबईला(dubai) जात आहे आणि यासाठी ५५लाखापर्यंतचा खर्च केला जात आहे. तेथे हे लोक फायझरची लस घेत आहे तर यूएईमध्ये अस्ट्राजनेका आणि सायनोफार्मची लसही उपलब्ध आहे. यूएईमध्ये ४० व४षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांना मोफत लस दिली जात आहे.

दुबईचा रेसिडेंट व्हिसा असलेले श्रीमंत भारतीय कोरोना लस घेण्यासाठी दुबईला जात आहेत. हा ट्रेंड मार्चमध्ये सुरू झाला जेव्हा दुबई रेसिडेंट व्हिसाधारकांसाठी लसीसाटी रजिस्टर करण्यासाठी परवानगी देण्यात आली. एप्रिलमध्ये यात वेग आला जेव्हा भारतात कोरोनाचे रुग्ण वाढत होते. दुबईमध्ये लस घेतलेल्या काही लोकांचे आणि चार्टर ऑपरेटर्सचे म्हणणे आहे काही लोक लसीचे दोन डोस घेण्यासाठ दुबईतच राहत आहे. तर काही लोक तेथील दोन चक्कर लावत आहेत. फायझरच्या लसीचे दोन डोस घेण्यासाठी तीन आठवड्यांचे अंतर असते. याबाबत अनेक लोकांनी आपले नाव न घेण्याच्या अटीवर ईटीशी बातचीत केली.

५५ लाखांचा खर्च

लस घेण्यासाठी दुबईचा येण्याजाण्याचा खर्च ३५ लाख ते ५५ लाख रूपये आहे. यापेक्षा अधिक खर्चही होऊ शकतो. हा खर्च ऑपरेटरची प्राईस, सिटी ऑफ ओरिजिन, दुबईत राहण्याचा कालावधी आणि नंबर ऑफ पॅसेंजरवर अवलंबून आहे. ज्या भारतीयांचा बिझनेस दुबईत रजिस्टर्ड आहेत त्यांच्याकडे रेसिडंट व्हिसा आहे. यूएई काही प्रोफेशनल कॅटेगरीजचा रेसिडेंट व्हिसाही देते.

दुबईच्या एका रेसिडेंट व्हिसा असलेल्या एका टॉप कॉर्पोरेट मॅनेजरने मार्चमध्ये दुबईत फायजरची लस घेतली होती. ते भारतातही लस घेण्यासाठी पात्र होते मात्र ते म्हणाले, मला वाटले की फायजरची लस चांगल्या पद्धतीने पारखून घेतलेली आणि सुरक्षित आहे. मी आणिमाझ्या पत्नीने एक प्रायव्हेट जेट घेतले आणि आम्ही दुबईत २० दिवस राहिलो. सर्वकाही सुरळीत आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी