Accident News: पालीमध्ये भक्तांवर काळाचा घाला, ट्रकची ट्रॅक्टरला धडकेत चिरडले 7 भाविक; 25 हून अधिक जखमी

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Aug 20, 2022 | 07:48 IST

Rajasthan Accident: या अपघातात 7 जणांचा (seven people were killed) मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Rajasthan Accident
भीषण रस्ता अपघात  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • या अपघातात 7 जणांचा (seven people were killed) मृत्यू झाला आहे.
  • या दुर्घटनेत 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
  • रामदेवरा येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला भरधाव वेगानं येणाऱ्या डंपरने चुकीच्या बाजूनं चिरडलं.

 राजस्थान:  Road accident in Rajasthan's Pali: राजस्थानच्या (Rajasthan) पाली(Pali ) जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याचं वृत्त आहे. या अपघातात 7  जणांचा (seven people were killed)  मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  सुमेरपूर ( Sumerpur town) पोलीस स्टेशन हद्दीत शुक्रवारी रात्री एका अनियंत्रित ट्रकनं भक्तांनी भरलेल्या ट्रॅक्टरला धडक दिली. रामदेवरा येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला भरधाव वेगानं येणाऱ्या डंपरने चुकीच्या बाजूनं चिरडलं. 

अधिक वाचा-  2024 च्या निवडणुकीत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मोदींसमोर कोणत्या नेत्याचं आव्हान?

कशी घडली दुर्घटना 

पाली जिल्ह्यातील सुमेरपूर पोलीस स्टेशन परिसरात रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिक ट्रॅक्टर ट्रॉलीतून जैसलमेर जिल्ह्यातील रामदेवरा मंदिरात दर्शनासाठी जात होते. त्यानंतर भरधाव वेगात आलेल्या ट्रॉलीने ट्रॅक्टरला धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की सात जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना शिवपूर आणि सुमेरपूर शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात मृत्यू झालेले सर्व भाविक गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

https://twitter.com/ANI_MP_CG_RJ/status/1560719643358072832

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.  पंतप्रधानांनी ट्विटद्वारे या प्रकरणी शोक व्यक्त केला आहे आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान कार्यालयानेही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पीएमओच्या वतीने ट्विट करण्यात आलं आहे. ट्विटमध्ये लिहिलं आहे की, राजस्थानमधील पाली येथे झालेला अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे.

या दु:खाच्या प्रसंगी आमच्या शोकसंवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी