Rohingya Muslims : दिल्लीच्या फ्लॅट्समध्ये नव्हे तर डिटेन्शन सेंटरमध्येच राहणार रोहिंग्या मुस्लिम, गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण 

रोहिंग्या मुस्लिमांना दिल्लीतील फ्लॅट्समध्ये रहायला जागा देऊ अशी घोषणा केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केली होती. त्यानंतर एकच गदारोळ झाला होता. अखेर केंद्रीय गृहमंत्रालयाने हे रोहिंग्या मुस्लिम डिटेन्शन सेंटरमध्येच राहतील असे स्पष्ट केले आहे.

Rohingya muslim
रोहिंग्या निर्वासित  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रोहिंग्या मुस्लिमांना दिल्लीतील फ्लॅट्समध्ये रहायला जागा देऊ अशी घोषणा केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केली होती.
  • त्यानंतर एकच गदारोळ झाला होता.
  • अखेर केंद्रीय गृहमंत्रालयाने हे रोहिंग्या मुस्लिम डिटेन्शन सेंटरमध्येच राहतील असे स्पष्ट केले आहे.

Rohingya Muslim : नवी दिल्ली : रोहिंग्या मुस्लिमांना (Rohingya Muslim) दिल्लीतील फ्लॅट्समध्ये रहायला जागा देऊ अशी घोषणा केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी (Union Minister Hardeep singh puri) यांनी केली होती. त्यानंतर एकच गदारोळ झाला होता. अखेर केंद्रीय गृहमंत्रालयाने (ministry of home affairs) हे रोहिंग्या मुस्लिम डिटेन्शन सेंटरमध्येच (Detention Center) राहतील असे स्पष्ट केले आहे.  केंद्रीय गृहमंत्रालयाने हे रोहिंग्या मुस्लिम डिटेन्शन सेंटरमध्येच राहतील असे स्पष्ट केले आहे. गृहमंत्रालयाने ट्विट (Tweet) करून हे स्पष्ट केले आहे की दिल्लीत आर्थिक मागासांसाठी (EWS) असलेल्या फ्लॅट्समध्ये रोहिंग्यांना ठेवण्यात येणार नाही. तसे कुठलेही निर्देश देण्यात आले नसल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.(Rohingya Muslims will stays in detention center ministry of home affairs clarify after union minister Hardeep Singh Puri tweets)

अधिक वाचा : Freebies Schemes: वीज, पाणी, आरोग्य सुविधांना मोफत म्हणायचे का? सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न


केंद्रीय हरदीप सिंह पुरी यांनी केले होते ट्विट

केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्विट करून सांगितले होते की रोहिंग्या निर्वासितांना एका नव्या ठिकाणी स्थानांतर करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. भारताने नेहमीच निर्वासितांचे स्वागत केले आहे. या रोहिंग्या निर्वासितांना दिल्लीतील बक्करवाला भागातील आर्थिक मागासवर्गीयांसाठी बनवलेल्या फ्लॅट्समध्ये स्थानांतर करण्यात येईल. त्यांना सर्व मूलभूत सोयी सुविधा प्रदान केल्या जातील असेही सिंह म्हणाले होते. 

अधिक वाचा : भाजपच्या संसदीय समितीची घोषणा; दिल्लीश्वरांचा महाराष्ट्र भाजपला धक्का

विहिंपचा विरोध

या निर्णयाला प्रथम विश्व हिंदू परिषदेने विरोध दर्शवला होता. विहिंपचे नेते आलोक कुमार यांनी दावा केला की रोहिंग्यांना जर दिल्लीत वसवले तर दिल्लीत असलेल्या हिंदूंना धोका निर्माण होईल. आधीच दिल्लीत राहणार्‍या हिंदू निर्वासितांची परिस्थिती बिकट आहे. केंद्र सरकारने आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करावा असे आवाहनही कुमार यांनी केले होते.  

अधिक वाचा : नक्षलवाद्यांचा नायनाट करणार अर्धनारेश्वराचा अवतार; बस्तर फायटर्स'साठी 2100 कॉन्स्टेबलपैकी नऊ ट्रान्सजेंडरची निवड; आयजी सुंदरराज यांनी केलं अभिनंदन

गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण

रोहिंग्या निर्वासितांना दिल्लीतील आर्थिक मागास वर्गीयांसाठी असलेल्या फ्लॅट्समध्ये ठेवण्यात येणार नसल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. भारतात जे रोहिंग्या आहेत त्यांना सध्या डिटेन्शन सेंटरमध्येच ठेवण्यात येणार असून या निर्वासितांना त्यांच्या मायदेशी कायद्यानुसार पुन्हा पाठवण्यात येणार असल्याचे गृहमंत्राल्याने म्हटले आहे. रोहिंग्या मुस्लिमांना डिटेन्शन सेंटर सोडून इतरत्र कुठेही ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. 

अधिक वाचा : Chocolate theft: चोरट्यांनी कहरच केला, तब्बल १७ लाखांच्या चॉकलेटवर मारला डल्ला

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी