रविशंकर प्रसाद यांच्या हेलिकॉप्टरला अपघात

Ravi Shankar Prasad Safe After Chopper Blade Damage At Patna Airport केंद्रीय विधी व न्याय खात्याचे मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला.

Ravi Shankar Prasad
केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद 

थोडं पण कामाचं

  • रविशंकर प्रसाद यांच्या हेलिकॉप्टरला अपघात
  • हेलिकॉप्टरच्या पंख्याचे पाते तुटले
  • केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद थोडक्यात वाचले

पाटणा (Patna): केंद्रीय विधी व न्याय खात्याचे (Union Minister of Law and Justice of India) मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. ही घटना बिहारची राजधानी पाटणा (Patna) येथे विमानतळावर घडली. उतरत असताना (Landing) हेलिकॉप्टरचा (helicopter or chopper) पंखा तुटला. या अपघातातून रविशंकर प्रसाद थोडक्यात वाचले, ते सुरक्षित आहेत. (Rotor Blade of Helicopter that Flew Ravi Shankar Prasad to Bihar Gets Damaged at Airport, Minister Safe)

पाटणा विमानतळावर रविशंकर प्रसाद यांच्या हेलिकॉप्टरला अपघात

पाटणा विमानतळावर तारेच्या कुंपणाला हेलिकॉप्टरच्या पंख्याचा स्पर्श झाला. यामुळे हेलिकॉप्टरच्या पंख्याचे पाते (ब्लेड) तुटले. हा अपघात होण्याच्या थोडा वेळ आधीच हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी उतरले होते. हेलिकॉप्टरचा वेगाने फिरत असलेला पंखा हळू हळू स्थिर करण्याची (थांबवण्याची) प्रक्रिया सुरू होती. अपघातात प्रवासी आणि हेलिकॉप्टर चालक (पायलट) यांच्यापैकी कोणालाही दुखापत झालेली नाही. 

बिहार विधानसभेच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टरने प्रवास करत होते रविशंकर प्रसाद

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Legislative Assembly Election) प्रचार सुरू आहे. रविशंकर प्रसाद प्रचारात सहभागी होण्यासाठी बिहारमध्ये आले होते. ते झंझारपूर येथे प्रचारासाठी गेले होते. तिथून परतताना त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय आणि संजय झा होते. हेलिकॉप्टर उतरल्यानंतर केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद, बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय आणि संजय झा लगेच बाहेर आले. या नंतर थोड्या वेळाने अपघात झाला. पार्किंगमध्ये (हँगर / hangar Area) हेलिकॉप्टरच्या रोटरचा (Helicopter rotor) तारेच्या कुंपणाला स्पर्श झाला आणि ब्लेडचे दोन-तीन तुकडे झाले. तंत्रज्ञांनी तातडीने रोटरचे ब्लेड बदलले आणि हेलिकॉप्टर सुस्थितीत असल्याची खात्री करुन घेतली.

अपघाताची घटना शनिवारी (१७ ऑक्टोबर २०२०) संध्याकाळी घडली. हेलिकॉप्टरचे जास्त नुकसान झाले नाही. 

बिहारमध्ये ३ टप्प्यात मतदान, पहिल्या टप्प्याचे मतदान २८ ऑक्टोबरला

बिहारमध्ये ३ टप्प्यात मतदान आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान २८ ऑक्टोबरला, दुसऱ्या टप्प्याचे ३ नोव्हेंबरला आणि चौथ्या टप्प्याचे ७ नोव्हेंबरला आहे. मतमोजणी १० नोव्हेंबरला आहे. सध्या बिहारमध्ये पहिल्या टप्प्यासाठी सर्व पक्षीय नेते आणि उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद बिहारमध्ये प्रचारासाठी आले होते. प्रचार मोहीम आटोपल्यानंतर ते हेलिकॉप्टरने पाटणा येथे परतले. रविशंकर प्रसाद सहप्रवाशांसह उतरल्यानंतर हेलिकॉप्टरचा किरकोळ अपघात झाला. रविशंकर प्रसाद यांनी ट्वीट करुन अपघाताची माहिती दिली.

भारतात काही हेलिकॉप्टर अपघातात प्रसिद्ध व्यक्तींचा मृत्यू

याआधीही भारतात (INDIA) हेलिकॉप्टरला अपघात (helicopter accident or helicopter crash) होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तांत्रिक बिघाड अथवा रोटरचा ब्लेड तुटण्याच्या घटनेमुळे अपघात झाले आहेत. यातील काही अपघातांमध्ये भारतातील राजकीय नेते अथवा सेलिब्रेटी यांचा मृत्यू झाला आहे. याच कारणामुळे हेलिकॉप्टर अपघाताचे वृत्त येताच भारतात चिंतेचे वातावरण पसरते. सुदैवाने ताज्या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी