३१ डिसेंबर २०१९ पासून दोन हजार रुपयांची नोट बंद होणार? जाणून घ्या सत्य

2000 rupees note: दोन हाजर रुपयांची नोट बंद होणार असल्याच्या संदर्भात सोशल मीडियात अनेक पोस्ट येत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणावर आता सरकारची प्रतिक्रिया आली आहे. 

rs 2000 note closure report denied anurag thakur mos finance corporate business news marathi
प्रातिनिधीक फोटो 

थोडं पण कामाचं

  • दोन हजार रुपयांची नोट बंद होण्याच्या पोस्ट सोशल मीडियात व्हायरल 
  • ३१ डिसेंबर २०१९ पासून नोट बंद होण्याच्या सोशल मीडियात पोस्ट 
  • यावर सरकारने दिलं स्पष्टीकरण

नवी दिल्ली: २०१६ मध्ये मोदी सरकारने नोटबंदी करुन सर्वांनाच एक धक्का दिला. नोटबंदीचा हा धसका अद्यापही कोणी विसरलेलं नाहीये. त्याच दरम्यान आता २००० रुपयांची नोट बंद होणार असल्याचं वृत्त सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून खरोखर पुन्हा नोटबंदी होणार का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर सरकारने स्पष्टीकरण देत म्हटलं आहे की दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याचा कोणताही विचार नाहीये.

सोशल मीडियात अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, ३१ डिसेंबर २०१९ पासून २००० रुपयांची नोट बंद होणार आहे, त्यामुळे तुम्ही अलर्ट व्हा आणि आपल्याकडील २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यास सुरुवात करा. अशा प्रकारचे मेसेज व्हायरल होत असल्याने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरकारने दिलं स्पष्टीकरण

दोन हजार रुपयांची नोट बंद होणार नाहीये. दोन हजारांची नोट बंद होणार असल्याच्या निव्वळ अफवा आहेत अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत दिली. सध्यातरी २००० रुपयांची नोट बंद करण्याची कोणतीही योजना सरकारची नाहीये असंही अनुराग ठाकूर यांनी सांगितले आहे.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री ८ वाजता देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० रुपये आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली. नोटबंदीची ही घोषणा त्याच दिवशी रात्रीपासून लागू झाली. मोदींनी केलेल्या या घोषणेमुळे सर्वांनाच एक धक्का बसला. यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच नागरिकांनी बँकांमध्ये नोटा बदली करण्यासाठी रांगा लावण्यास सुरुवात केली. यानंतर मोदी सरकारने ५०० रुपयांच्या नव्या नोटा तसेच २००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी