Mohan Bhagawt on Government : संघ सरकारचा रीमोट कंट्रोल नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेहमीच सरकारचा एक रीमोट कंट्रोल म्हटले जाते पण असे नाहिये असे स्पष्टीकरण सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिले. तसेच सध्या भारत एक जागतिक शक्ती नाही, परंतु या महामारीनंतर आपल्यात विश्वगुरू बनण्याची पूर्ण क्षमता आहे असेही भागवत म्हणाले.  rss is not remote control of government rss chief mohan bhagwat clarify

Mohan Bhagwat
मोहन भागवत 
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेहमीच सरकारचा एक रीमोट कंट्रोल म्हटले जाते
  • नसल्याचे स्पष्टीकरण सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिले.
  • भारतात विश्वगुरू बनण्याची पूर्ण क्षमता

Mohan Bhagawt on Government :चेन्नई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेहमीच सरकारचा एक रीमोट कंट्रोल म्हटले जाते पण असे नाहिये असे स्पष्टीकरण सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिले. तसेच सध्या भारत एक जागतिक शक्ती नाही, परंतु या महामारीनंतर आपल्यात विश्वगुरू बनण्याची पूर्ण क्षमता आहे असेही भागवत म्हणाले.  (rss is not remote control of government rss chief mohan bhagwat clarify)

माजी सैनिकांच्या एका कार्यक्रमात भागवत म्हणाले की “माध्यमांनी नेहमीच आम्हाला सरकारचे रीमोट कंट्रोल म्हटले आहे. परंतु हे खोटं आहे. आमचे काही कार्यकर्ते सरकारमध्ये आहेत. सरकार आमच्या स्वयंसेवकांना कुठल्याही प्रकारचे आश्वासन देत नाही. परंतु लोक आम्हाला विचारतात की सरकारकडून आम्हाला काय मिळतं, आमच्याकडे जे आहे ते आम्हाला गमवावे लागत नाही असे त्यावर आमचे उत्तर आहे असे भागवत म्हणाले.  तसेच सध्या भारत एक जागतिक शक्ती नाही परंतु या महामारीनंतर आपल्यामध्ये विश्वगुरू बनण्याची पूर्ण क्षमता आहे असेही भागवत म्हणाले. 

कुणाच्या ताकदीमुळे नव्हे तर आपल्या कमतरतेमुळे परायज

भागवत म्हणाले या भारतभूमीवर वर्षानुवर्षे परदेशी आक्रमण झाली आणि स्थानिक त्यांच्याविरोधात जिंकू नाही शकले, कारण स्थानिकांमध्ये कुठलीच एकता नव्हती. आपण कुणाच्या ताकदीमुळे नव्हे तर आपल्यातील कमतरतेमुळे हरलो असे आंबेडकरांनी म्हटले होते याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी