तिरुअनंतपुरम: एक बॉम्ब हल्ल्याची (Bomb Attack) बातमी समोर येत आहे. केरळमधील (Kerala) कन्नूर (Kannur) येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर (Rashtriya Swayamsevak Sangh) बॉम्ब हल्ला करण्यात आला आहे. आज सकाळी ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. बॉम्ब हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. आरएसएस कार्यालयावर असा हल्ला होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशा बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला.
वृत्तसंस्था ANI नं दिलेल्या वृत्तानुसार, कन्नूर जिल्ह्यातील पयानूर येथील आरएसएस कार्यालयावर बॉम्ब फेकण्यात आला. आज सकाळी ही घटना घडली. घटनेदरम्यान इमारतीच्या खिडक्यांच्या काचाही तुटल्या आहेत. कार्यालयाचं मोठं नुकसान झालं आहे.
Kerala | Bomb hurled at RSS office in Payyannur, Kannur district. The incident happened early this morning with window glasses of the building broken in the attack, as per Payyannur police — ANI (@ANI) July 12, 2022
भाजप नेते टॉम वडक्कन यांच्याकडून या बॉम्ब हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. वडक्कन म्हणाले की, पोलिसांची अशा प्रकारे होणारी मिलीभगत अत्यंत धोकादायक आहे. कार्यालयापासून पोलीस स्टेशन 100 मीटर अंतरावर असून असे हल्ले कसे होतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पोलीस स्टेशन जवळ असल्यानं तिथे सुरक्षा अधिक कडेकोट असावी, असंही त्यांनी म्हटलं आहे. पुढे वडक्कन म्हणाले की, राज्यातील कोणत्याही राजकीय कार्यालयाचं नुकसान झाल्यास राज्य सरकारला जबाबदार धरलं पाहिजे.
वडक्कन यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही आरएसएस कार्यालये आणि कार्यकर्त्यांवर असे हल्ले झाले आहेत. अशा कायदा आणि सुव्यवस्थेवर लवकरात लवकर कारवाई करणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस आणि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी केरळमधील हल्ल्याचा निषेध केला. तसंच ट्विटरवर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना टॅग करत म्हणाले- तुम्ही ही समस्या गांभीर्याने घ्या आणि पोलिसांना ताबडतोब गुन्हेगारांना पकडण्याचे निर्देश द्या.