आण्विक दुर्घटना टाळण्यासाठी रशियाच्या सैन्याची मोठी कारवाई

Russia detained DG of Zaporizhia Nuclear Power Plant says Ukraine : युक्रेनमधील झापोरिझिया अणुसंयंत्र (अणुभट्टी) प्रमुख रशियाच्या ताब्यात आहे. झापोरिझिया अणुसंयंत्र परिसरात ठिकठिकाणी रशियाने मोर्चेबांधणी केली आहे.

Russia detained DG of Zaporizhia Nuclear Power Plant says Ukraine
आण्विक दुर्घटना टाळण्यासाठी रशियाच्या सैन्याची मोठी कारवाई  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आण्विक दुर्घटना टाळण्यासाठी रशियाच्या सैन्याची मोठी कारवाई
  • झापोरिझिया अणुसंयंत्र प्रमुख रशियाच्या ताब्यात
  • युक्रेनच्या चिंतेत वाढ

Russia detained DG of Zaporizhia Nuclear Power Plant says Ukraine : युक्रेनमधील झापोरिझिया अणुसंयंत्र (अणुभट्टी) प्रमुख रशियाच्या ताब्यात आहे. झापोरिझिया अणुसंयंत्र परिसरात ठिकठिकाणी रशियाने मोर्चेबांधणी केली आहे. रशियाचे सैन्य झापोरिझिया अणुसंयंत्र परिसरातून युक्रेनच्या सैन्यावर हल्ले करत आहे आणि युक्रेनकडून या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. या संघर्षात कळत नकळत कोणत्याही सैन्याच्या हल्ल्यामुळे अणुसंयंत्रात मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. परिस्थिती चिंताजनक आहे, असे युक्रेन सरकारकडून मीडियाला सांगण्यात आले. तर आण्विक दुर्घटना टाळण्यासाठी ही कारवाई केली असल्याची शक्यता रशिया समर्थक संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

काही वर्षांपूर्वी सोव्हिएत युनियनचा (सोव्हिएत संघ) भूभाग असलेला युक्रेन स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर युक्रेनने प्रगती केली. पण युक्रेनने अलिकडेच नाटोमध्ये सहभागी होण्यासाठी हालचाली सुरू केल्या. युक्रेनच्या या हालचालींमुळे रशियाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे जाहीर करत रशियाने युक्रेन आणि नाटो यांना ताकीद दिली. पण युक्रेन सरकारच्या हालचाली थांबल्या नाही. अखेर स्वसंरक्षणाचे कारण देत रशियाने युक्रेन विरोधात लष्करी कारवाई सुरू केली. या कारवाई अंतर्गत रशियाने युक्रेनच्या निवडक प्रांतांचे रशियात विलीनीकरण केले. तर काही प्रांतांना मर्यादीत स्वायत्तता (स्वातंत्र्य) दिली. ही संपूर्ण प्रक्रिया मतदान (जनमत चाचणी) घेऊन जनतेचा कौल जाणून घेतल्यानंतर करत असल्याचे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी जाहीर केले. ही कारवाई सुरू असतानाच रशियाने युक्रेनमधील झापोरिझिया अणुसंयंत्र परिसरातील मोर्चेबांधणी आणखी भक्कम केली आणि अणुसंयंत्र प्रमुखाला ताब्यात घेतले. रशियाच्या या धडक कारवायांमुळे युक्रेनमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

PM Modi: देशाला मिळाली तिसरी Vande Bharat Express, पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

रशियाने युक्रेनचा क्रीमिया हा प्रांत 2014 मध्येच रशियात विलीन केला. आता युक्रेनचे लुहान्स्क, डोनेट्स्क , झापोरिझिया आणि खेरसॉन हे चार प्रांत पण रशियाने विलीन करून घेतले. विलीन करून घेतलेल्या प्रांतांपैकी झापोरिझिया आणि खेरसॉन या दोन प्रांतांना रशिया सरकारच्या अधीन राहून मर्यादीत स्वायत्तता (स्वातंत्र्य) मिळणार आहे. यामुळे युक्रेनचा सुमारे 15 टक्के भूभाग आता रशियाच्या ताब्यात आहे. युक्रेनला एका मागून एक तडाखे दिल्यानंतर आता रशियाच्या सैन्याने झापोरिझिया अणुसंयंत्र परिसरात कारवाई सुरू केली आहे. झापोरिझिया अणुसंयंत्र प्रमुखाला रशियाच्या सैन्याने ताब्यात घेतले आहे. धाक दाखवून त्याच्याकडून झापोरिझिया अणुसंयंत्राबाबतची सर्व महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा आणि संपूर्ण अणुसंयंत्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न रशियाचे सैन्य करत असल्याची शक्यता युक्रेन सरकारने बोलून दाखविली आहे.

Pakistani Airlines latest : एअर होस्टेसने विमानात योग्य अंडरगारमेंट परिधान करावे... पाकिस्तानी एअरलाइनचा विचित्र आदेश

अणुसंयंत्र ताब्यात ठेवण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात कळत नकळत दुर्घटना होण्याचा धोका आहे. या चिंता वाढविणाऱ्या वातावरणात रशियाच्या सैन्याने झापोरिझिया अणुसंयंत्र प्रमुखाला ताब्यात घेतले आहे. अणुसंयंत्र पूर्ण नियंत्रणात ठेवणे, सुरक्षित करणे आणि दुर्घटनेचा धोका टाळणे हे उद्देश साध्य करण्यासाठी रशियाने कारवाई केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सोव्हिएत युनियन असताना 26 एप्रिल 1986 रोजी चेर्नोबिल अणुसंयंत्र येथे दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर किरणोत्सार झाला आणि चेर्नोबिल या शहराची वाताहात झाली. आज चेर्नोबिल हे युक्रेनच्या ताब्यात आहे. पण या शहराचा वापर प्रामुख्याने लष्करी कवायतींसाठी होत आहे. चेर्नोबिलसारखी दुर्घटना झापोरिझिया येथे संघर्ष सुरू असताना होऊ नये यासाठी रशियाने खबरदारी म्हणून हालचाली केल्याची शक्यता रशिया समर्थक संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. रशियाकडून मात्र झापोरिझिया अणुसंयंत्र प्रमुखाला ताब्यात घेतल्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. सध्या झापोरिझिया अणुसंयंत्र प्रमुख अज्ञात ठिकाणी असून त्याची रशियाचे अधिकारी चौकशी करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी