ISच्या दहशतवाद्याला रशियात अटक, भारतात करणार होता आत्मघातकी हल्ला

Russia detains IS suicide bomber plotting terrorist attack in India : रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने इस्लामिक स्टेटच्या एका दहशतवाद्याला अटक केल्याचे जाहीर केले. हा दहशतवादी भारतात आत्मघातकी हल्ला करण्यासाठी तयारी करण्यात गुंतला होता.

Russia detains IS suicide bomber plotting terrorist attack in India
ISच्या दहशतवाद्याला रशियात अटक, भारतात करणार होता आत्मघातकी हल्ला  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ISच्या दहशतवाद्याला रशियात अटक, भारतात करणार होता आत्मघातकी हल्ला
  • भारतात एका प्रभावी सत्ताधारी नेत्याला आत्मघातकी हल्ला करून ठार करण्याची होती योजना
  • पकडलेल्या दहशतवाद्याला ISने तुर्कस्तानमधून भरती केले होते

Russia detains IS suicide bomber plotting terrorist attack in India : रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने इस्लामिक स्टेटच्या एका दहशतवाद्याला अटक केल्याचे जाहीर केले. हा दहशतवादी भारतात आत्मघातकी हल्ला करण्यासाठी तयारी करण्यात गुंतला होता. रशियातील वृत्तसंस्था 'स्पुटनिक'ने ही माहिती दिल्याची बातमी एएनआय या भारतीय वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली आहे. । लोकल ते ग्लोबल

त्रालमध्ये टळली मोठी दहशतवादी घटना, 10-12 किलो IED जप्त

इस्लामिक स्टेट या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेवर बंदी आहे. या संघटनेचा एक दहशतवादी घातपात करण्यासाठी तयारी करत असल्याची ठोस माहिती रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसला मिळाली. यानंतर पाळत ठेवून दहशतवाद्याला पकडण्यात आले. पकडलेला दहशतवादी मध्य आशियातील एका देशाचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती रशियातील वृत्तसंस्था 'स्पुटनिक'ने दिली. 

ओबीसी आरक्षणाची सुनावणी पाच आठवडे पुढे ढकलली

भारतात एका प्रभावी सत्ताधारी नेत्याला आत्मघातकी हल्ला करून ठार करण्यासाठी हा दहशतवादी घातपाताची तयारी करत होता. या दहशतवाद्याला इस्लामिक स्टेट या बंदी असलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या एका नेत्याने तुर्कस्तानमध्ये भरती करून घेतले होते. या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि लवकरच आणखी माहिती मिळेल असे रशियातील वृत्तसंस्था 'स्पुटनिक'ने सांगितले.

जगातील अनेक देशांमध्ये इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेवर तसेच या संघटनेशी संबंधित अनेक व्यक्तींवर बंदी आहे. यामुळे रशियात झालेल्या कारवाईकडे अनेकांचे लक्ष आहे. 

इस्लामिक स्टेट ही दहशतवादी संघटना सोशल मीडियाचा वापर करून जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये नव्या दहशतवाद्यांची भरती करत असते. यामुळे पकडलेल्या दहशतवाद्याच्या माध्यमातून इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेविषयी आणखी माहिती मिळेल अशी शक्यता व्यक्त होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी