रशियाने केली झिरकॉन हायपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Russia successfully test fires Zircon hypersonic cruise missile : रशिया आणि युक्रेन यांच्यात संघर्ष सुरू असताना रशियाने झिरकॉन हायपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राची (Zircon hypersonic cruise missile) यशस्वी चाचणी केल्याचे जाहीर केले.

Russia successfully test fires Zircon hypersonic cruise missile
रशियाने केली झिरकॉन हायपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी 
थोडं पण कामाचं
  • रशियाने केली झिरकॉन हायपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
  • एक हजार किमी पल्ला
  • काही दिवसांपूर्वी रशियाने सरमत (Sarmat) अण्वस्त्रवाहक आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली

Russia successfully test fires Zircon hypersonic cruise missile : रशिया आणि युक्रेन यांच्यात संघर्ष सुरू असताना रशियाने झिरकॉन हायपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राची (Zircon hypersonic cruise missile) यशस्वी चाचणी केल्याचे जाहीर केले. झिरकॉन हायपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राच्या एक हजार किमी पल्ला असलेल्या आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतल्याचे रशियाने जाहीर केले. हे क्षेपणास्त्र आवाजाच्या गतीच्या नऊ पट जास्त वेगाने प्रवास करते आणि एक हजार किमी. पर्यंतच्या टप्प्यात अचूक आणि भेदक हल्ला करते. याआधी पण झिरकॉनच्या चाचण्या झाल्या आहेत. पण ही चाचणी सेवेत दाखल करुन घेण्याआधीची क्षेपणास्त्राची शेवटची चाचणी असल्याचे समजते.

साखरेवर निर्यात बंदी लागू होणार

काही दिवसांपूर्वी रशियाने सरमत (Sarmat) अण्वस्त्रवाहक आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. हे क्षेपणास्त्र रशियातून थेट अमेरिकेवर हल्ला करण्यास सक्षम आहे. हे अण्वस्त्रवाहक आंतरखंडीय क्षेपणास्त्र एकाचवेळी दहा लक्ष्यांवर हल्ला करून त्यांना नष्ट करण्यास सक्षम असल्याची माहिती रशियाने दिली होती.

रशिया सातत्याने रॉकेट, क्षेपणास्त्र, तोफा, रडार यांच्या क्षेत्रात संशोधन करत आहे. संहारक शस्त्रांची आणि आधुनिक रडार यंत्रणेची निर्मिती करून रशिया स्वतःच्या संरक्षण दलांना लढण्यासाठी तसेच स्वसंरक्षणासाठी अतिरिक्त बळ मिळवून देत आहे. रशियाने केलेल्या झिरकॉन हायपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे पाश्चात्य देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाची व्याप्ती वाढण्याचा, रशिया आणखी काही देशांना लक्ष्य करण्याचा धोका नाटोशी संबंधित अधिकारी वारंवार करत आहेत. या पार्श्वभूमीवर झिरकॉन हायपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे रशियाच्या सामर्थ्याविषयी पुन्हा एकदा संरक्षण क्षेत्रातील अभ्यासकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी