जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा, मुंबई हल्ल्याचे गुन्हेगार 5 स्टार हॉटेलांमध्ये लुटत आहेत मजा

लोकल ते ग्लोबल
Updated Jan 13, 2021 | 15:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी डिजिटल पद्धतीने बैठकीला संबोधित करताना म्हटले, ‘सर्वात आधी दहशतवादाचा सामना करण्यासाठी दृढ राजकीय इच्छाशक्ती दिसायला हवी.’

S. Jaishankar
जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा, मुंबई हल्ल्याचे गुन्हेगार 5 स्टार हॉटेलांमध्ये लुटत आहेत मजा  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • दहशतवादाविरोधातल्या लढाईसाठी राजकीय इच्छाशक्ती गरजेची
  • यूएनएससीच्या मंत्रिस्तरीय बैठकीला संबोधित करत होते जयशंकर
  • चीनवरही साधला निशाणा

नवी दिल्ली: भारताने (India) मंगळवारी म्हटले की आंतरराष्ट्रीय समुदायाने (international community) दहशतवाद (terrorism) हा कायदेशीर (legalizing) ठरवण्याची आणि त्याला पाठिंबा (support) देण्याची परवानगी देता कामा नये. भारताने पाकिस्तानात (Pakistan) लपून बसल्याचा संशय (speculation) असलेल्या दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) हवाला देत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला (United Nations Security Council) सांगितले की १९९३च्या मुंबई बाँबस्फोटांसाठी (Mumbai bomb blasts) जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटनांच्या (terrorists organization) आरोपींना फक्त सरकारी संरक्षणच (government protection) मिळत नसून ते पंचतारांकित हॉटेलांमध्ये (five star hotels) मजा लुटत आहेत.

दहशतवादाविरोधातल्या लढाईसाठी राजकीय इच्छाशक्ती गरजेची

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी डिजिटल पद्धतीने बैठकीला संबोधित करताना म्हटले, ‘सर्वात आधी आपल्याला दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दृढ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. या लढाईत कोणताही किंतु-परंतु असता कामा नये.’ त्यांनी सांगितले की दहशतवादाला योग्य ठरवता येऊ शकत नाही, त्याचे गुणगान होऊ शकत नाही. सर्व सदस्य राष्ट्रांनी दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपल्या कटिबद्धतेचे आणि सर्व करारांचे पालन करावे.

यूएनएससीच्या मंत्रिस्तरीय बैठकीला संबोधित करत होते जयशंकर

जयशंकर हे प्रस्ताव १३७३ (२००१)चा स्वीकार झाल्यानंतर ’२० वर्षांत दहशतवादाविरोधातल्या लढाईत आंतरराष्ट्रीय सहयोग आणि दहशतवादी कृत्यांमुळे आंतरराष्ट्रीय सहयोग आणि सुरक्षेला धोका’ या विषयावर यूएनएससीच्या मंत्रिस्तरीय बैठकीला संबोधित करत होते. या महिन्यात १५ सदस्यांच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या अस्थायी सदस्य म्हणून कार्यकाळाला सुरुवात झाली ज्यानंतर पहिल्यांदा हे संबोधन पार पडले. जयशंकर यांनी दहशतवादाच्या समस्येचे विश्वसनीय समाधान आणि प्रभावी कारवाई सुनिश्चित करण्यासाठी आठसूत्री कार्ययोजनेचा प्रस्तावही ठेवला. ते म्हणाले, की की १९९३च्या मुंबई बाँबस्फोटांसाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटनांच्या आरोपींना फक्त सरकारी संरक्षणच मिळत नसून ते पंचतारांकित हॉटेलांमध्ये मजा लुटत आहेत.

चीनवरही साधला निशाणा

त्यांनी अप्रत्यक्षरित्या चीनवर निशाणा साधला जो जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख सूत्रधार मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नात पुन्हा पुन्हा बाधा आणत असतो. ते म्हणाले की दहशतवादाला आळा घालण्यासाठी आपल्याला सर्व समित्यांच्या कामकाजात सुधारणा कराव्या लागतील. पारदर्शकता, जबाबदारी आणि ठोस पावले उचलणे ही काळाची गरज आहे. कोणत्याही कारणाशिवाय या यादीत नाव समाविष्ट करण्यात घालण्याची प्रवृत्ती बंद व्हायला हवी. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी याच कारवायांमुळे भारताला साधारण दहा वर्षे आटापिटा करावा लागला ज्यानंतर 2019मध्ये या यादीत त्याचे नाव संयुक्त राष्ट्राने समाविष्ट केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी