Salman Rushdi : सलमान रश्दी (Salman Rushdi) यांनी 1988 साली ‘द सॅनेटिक व्हर्सेज’ नावाची कादंबरी लिहिली होती. ही कादंबरी (Novel) लिहिल्याची शिक्षा (Punishment) म्हणून रश्दी यांना ठार मारण्याचा (Order to kill) फतवा इराणचे (Iran) सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी (Ayatullah Khomeini) यांनी काढला होता. हा फतवा जारी करून 33 वर्षं झाल्यानंतर सलमान रश्दींवर खुनी हल्ला करण्यात आला आहे. शुक्रवारी त्यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर सध्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रश्दींना आपला एक डोळा गमवावा लागेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणं या चाकूहल्ल्यात त्यांच्या हृदयालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
सलमान रश्दींनी लिहिलेल्या ‘द सॅनेटिक व्हर्सेज’ या पुस्तकावर जगभरातील अनेक मुस्लीम राष्ट्रांनी आक्षेप घेतला होता. अयातुल्ला खोमेनी यांनी रश्दींना ठार मारण्याचा फतवा जारी केला होता. रश्दींना ठार करा म्हणजे पुन्हा कुणीही इस्लामबाबत आक्षेपार्ह विधान करण्यापूर्वी विचार करेल, असं त्यांनी म्हटलं होतं. रश्दींवर 28 लाख डॉलरचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. रश्दींना मारण्याच्या प्रयत्नात ज्याला जीव गमवावा लागेल, त्याला जन्नत मिळेल, असंही खोमेनी यांनी म्हटलं होतं. या फतव्यानंतर रश्दींचं आयुष्य बदलून गेलं. त्यानंतरची 13 वर्षं रश्दींना नामांतर करून राहावं लागलं. जोसेफ अँटोन हे नाव त्यांनी धारण केलं आणि आपले मुक्कामही ते सतत बदलत राहिले. गेल्या सहा महिन्यात त्यांनी 56 वेळा आपलं घर बदललं.
अधिक वाचा - Sonia Gandhi News: सोनिया गांधींना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोना
अर्थात, अशा प्रकारे ठार मारण्याचा फतवा केवळ सलमान रश्दींविरोधात निघाला नव्हता. त्यांच्यासोबत त्यांच्या कादंबरीचा अनुवाद करणारे जपानी लेखक हितोशी इगारशी यांची 1999 साली टोकियोतील सुकुबा विद्यापीठाच्या परिसरात हत्या कऱण्यात आली होती. त्यांच्या शरीरावर चाकूचे गंभीर वार होऊन रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी जाहीर केलं होतं. याच कादंबरीचा इटालियन भाषेत अनुवाद करणारे ॲटोर कॅप्रियोलो यांच्यावरही मिलान अपार्टमेंटमध्ये खुनी हल्ला कऱण्यात आला होता. मात्र त्यातून ते बचावले होते. ते मेल्याचं समजून मारेकरी तिथून निघून गेले होते.
अधिक वाचा - Murder of family : सासू, दीर, भावजय आणि पुतणी… महिलेनं केली सर्वांची हत्या, कारण होतं किरकोळ
या हत्येमुळे इंग्लंड आणि इराण संबंध ताणले गेल्याचं चित्र आहे. मात्र या हल्ल्याशी आपला कुठलाही संबंध नसून आपण त्याचं बिलकूल समर्थन करत नसल्याची प्रतिक्रिया इराणचे नेते मोहम्मद खातमी यांनी दिली आहे. मात्र तिथल्या सरकारी यंत्रणांमधून मिळणाऱ्या माहितीनुसार 33 वर्षांपूर्वी दिला गेलेला फतवा अजूनही प्रभावी आहे. आता रश्दींची हत्या करणाऱ्याला मिळणाऱ्या बक्षीसाची रक्कम 30 लाख डॉलरच्याही वर पोहोचली आहे.