UP Election 2022 : पक्षाने कापले विधानसभेचे तिकीट, निराश झालेल्या समाजवादी पक्षाच्या नेत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

UP Elections 2022 उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. समाजवादी पक्ष ५-६ छोट्या पक्षांना घेऊन आघाडी उभारली असून निवडणुकीच्या लढाईत उतरले आहेत. तर दुसरीकडे एका नेत्याला पक्षाने तिकीट नाकारल्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. आदित्य ठाकूर असे या समाजवादी पक्षाच्या नेत्याचे नाव असून त्यांनी अंगावर रॉकेल टाकूल स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला.

Samajwadi Party worker attempts self immolation after being denied ticket to contest polls
सपा कार्यकर्ता  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
 • एका नेत्याला पक्षाने तिकीट नाकारल्याने आत्मदहनाचा प्रयत्न
 • वेळीच पोलिसांनी त्यांना रोखले आणि पुढील अनर्थ टळला.
 • अन्याय झाला असून बाहेरच्या व्यक्तीला तिकीट दिल्याचा आरोप

UP Elections 2022 : लखनौ : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. समाजवादी पक्ष ५-६ छोट्या पक्षांना घेऊन आघाडी उभारली असून निवडणुकीच्या लढाईत उतरले आहेत. तर दुसरीकडे एका नेत्याला पक्षाने तिकीट नाकारल्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. आदित्य ठाकूर असे या समाजवादी पक्षाच्या नेत्याचे नाव असून त्यांनी अंगावर रॉकेल टाकूल स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी त्यांना रोखले आणि पुढील अनर्थ टळला. 


उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये सकाळी ११ च्या सुमारास समाजवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेर एकच गोंधळ उडाला. समाजवादी पक्षाचे नेते आदित्य ठाकूर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. ठाकूर हे अलीगढ जिल्ह्यातील छर्रा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. परंतु त्यांना तिकीट न मिळाल्याने ते अस्वस्थ झाले. त्यांनी पक्षाच्या कार्यालयासमोरच अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. आपण आयुष्यभर पक्षासाठी काम केले पण आपल्याला तिकीट मिळाले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अलीगढ जिल्ह्यातील छर्रातून त्यांना तिकीट न मिळाले ते नाराज झाले. पोलिसांनी वेळीच त्यांना पकडले आणि आत्मदहनापासून रोखले. त्यांची मेडिकलसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.


ठाकूर आदित्य म्हणाले की मी माझे संपूर्ण आयुष्य पक्षासाठी दिले. गेल्या पाच वर्षापासून छर्रा मतदारसंघात काम केले. परंतु मला तिकीट नाही मिळाले. मला न्याय हवा अशी मागणी ठाकूर यांनी केली. आपल्यावर अन्याय झाला असून बाहेरच्या व्यक्तीला तिकीट दिल्याचा आरोपही त्यांनी केला.  


योगी सरकारमधील तीन मंत्री आणि 11 आमदारांचा भाजपला रामराम


उत्तरप्रदेश योगी मंत्रिमंडळातील आतापर्यंत तीन मंत्री आणि 11 आमदारांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंह चौहान आणि धरम सिंह सैनी यांचा समावेश आहे. पूर्ण यादी वाचा...

 1. राधा कृष्ण शर्मा, बदायूं जिल्ह्यातील बिलसी येथील आमदार.
 2. राकेश राठोड, सीतापूरचे आमदार.
 3. माधुरी वर्मा, बहराइचमधील नानपारा येथील आमदार.
 4. जय चौबे, संत कबीरनगरचे भाजप आमदार.
 5. स्वामी प्रसाद मौर्य, कॅबिनेट मंत्री
 6. भगवती सागर, आमदार, बिल्हौर कानपूर
 7. ब्रिजेश प्रजापती, आमदार
 8. रोशन लाल वर्मा, आमदार
 9. विनय शाक्य, आमदार
 10. अवतारसिंह भदाना, आमदार
 11. दारा सिंह चौहान, कॅबिनेट मंत्री
 12. मुकेश वर्मा, आमदार
 13. धरमसिंग सैनी, कॅबिनेट मंत्री
 14. बाळाप्रसाद अवस्थी, आमदार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी