कोश्यारींनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर संभाजीराजेंचं थेट राष्ट्रपती अन् पंतप्रधानांना पत्र, वाचा काय म्हटलंय पत्रात...

Sambhajiraje Chhatrapati letter to PM and President: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर आता संभाजीराजे यांनी थेट राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. 

Sambhajiraje Chhatrapati writes letter to president and prime minister over controversial statement of governor bhagat singh koshyari read in marathi
कोश्यारींनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर संभाजीराजेंचं थेट राष्ट्रपती अन् पंतप्रधानांना पत्र, वाचा काय म्हटलंय पत्रात... 
थोडं पण कामाचं
  • राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर संभाजीराजेंचा संताप
  • कोश्यारींच्या विधानानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले
  • भगतसिंह कोश्यारी यांना राष्ट्रपती महोदया व पंतप्रधान यांनी तात्काळ महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटवावे - संभाजीराजे 

Sambhajiraje on Bhagat Singh Koshyari: राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. याच संदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. संभाजीराजे यांनी ट्विट करत म्हटलं, "छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दल अवमानकारक विधाने करणारे भगतसिंह कोश्यारी यांना राष्ट्रपती महोदया व पंतप्रधान यांनी तात्काळ महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटवावे".

संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं

माननीय नरेंद्रभाई मोदी जी,

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांची नियुक्ती झालेपासून सातत्याने महाराष्ट्र राज्य व महापुरूषांबाबत वादग्रस्त व अपमानास्पद विधाने करीत असून राज्यातील सामाजिक सलोखा व शांततेस बाधा पोहोचेल असे वर्तन त्यांच्याकडून होत आहे.

केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत तसेच महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले, महाराष्ट्रची संस्कृती व परंपरा, इथले अर्थकारण, मराठी अस्मिता या बाबतीत सातत्याने बेताल भाष्य करून ते केवळ राज्यातील जनतेच्या भावनांचा अपमान करीत नसून, त्यांच्या अशा वर्तणुकीमुळे "राज्यपाल" या पदाचे देखील अवमूल्यन होत आहे..

आपण देशाचे पंतप्रधान एकिकडे नौदलाचे जनक म्हणून आपण महाराजांचा गौरव करता, आणि दुसरीकडे राज्यपाल अवमानकारक बोलतात.

करिता, राज्यातील जनतेच्या भावनेचा विचार करून भगतसिंह कोश्यारी यांना तात्काळ महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदावरून पदमुक्त करावे.

आपला,
संभाजी छत्रपती

संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं

माननीय राष्ट्रपती महोदया,

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांची नियुक्ती झालेपासून सातत्याने महाराष्ट्र राज्य व महापुरूषांबाबत वादग्रस्त व अपमानास्पद विधाने करीत असून राज्यातील सामाजिक सलोखा व शांततेस बाधा पोहोचेल असे वर्तन त्यांच्याकडून होत आहे.

केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत तसेच महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले, महाराष्ट्रची संस्कृती व परंपरा, इथले अर्थकारण, मराठी अस्मिता या बाबतींत सातत्याने बेताल भाष्य करून ते केवळ राज्यातील जनतेच्या भावनांचा अपमान करीत नसून, त्यांच्या अशा वर्तणुकीमुळे "राज्यपाल" या पदाचे देखील अवमूल्यन होत आहे.

देशाचे पंतप्रधान एकिकडे नौदलाचे जनक म्हणून महाराजांचा गौरव करतात, आणि दुसरीकडे राज्यपाल अवमानकारक बोलतात.

करिता राज्यातील जनतेच्या भावनेचा विचार करून भगतसिंह कोश्यारी यांना तात्काळ महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदावरून पदमुक्त करावे.

आपला,
संभाजी छत्रपती

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी