Malik VS Sameer Wankhede: समीर वानखेडेंंची अनुसूचित जाती आयोगात धाव, आयोगाचे अध्यक्ष म्हणाले, 'आम्ही कागदपत्रांची पडताळणी करू'

Malik VS Sameer Wankhede: एका क्रूझ शिपमध्ये सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणाची (Drugs case) चौकशी करणारे समीर वानखेडे (Sameer Wankhede)वादात सापडले आहेत.

Malik VS Sameer  commission chairman says, We will verify documents
अनुसूचित जाती आयोग वानखेडेंच्या कागदपत्रांची पडताळणी करणार  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वानखेडे यांनी बनावट प्रमाणपत्रांचा वापर केल्याचा आरोप महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केला.
  • अनुसूचित जाती आयोग वानखेडेंच्या कागदपत्रांची पडताळणी करणार
  • समीर वानखेडे यांनी कोणताही धर्म परिवर्तन केलेला नाही-एससी/एसटी आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर

Malik VS Sameer Wankhede: नवी दिल्ली :  एका क्रूझ शिपमध्ये सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणाची (Drugs case) चौकशी करणारे समीर वानखेडे (Sameer Wankhede)वादात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP leader) आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (State Minority Minister Nawab Malik) हे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede, Divisional Director, NCB) यांच्यावर विविध आरोप करत आहेत. समीर वानखेडे यांनी बनावट कागदपत्र दाखवून नोकरी हडपल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. त्यानंतर समीर वानखेडे यांनी शनिवारी मुंबईत एससी/एसटी आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली होती.

वानखेडे यांनी आयोगाकडे त्यांच्या जातीवर प्रश्न उपस्थित केल्याची तक्रार केली होती. दरम्यान आज परत समीर वानखेडे यांनी दिल्लीतील राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगात दाखल झाले आणि त्यांनी आयोगाचे अध्यक्ष सांपला यांची भेट घेतली. याबाबत स्पष्टीकरण देताना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष रामनाथ पारधी म्हणाले, ''आयोगासमोर आपले म्हणणे मांडण्यासाठी ते येथे आले आहेत. सध्या आम्ही त्यांची कागदपत्रे पाहू आणि पडताळू, असे ते म्हणाले''.

एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले की, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे मुंबई क्रुझ शिप ड्रग्स प्रकरणी तपास करत आहेत. वानखेडे हे सोमवारी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष विजय सांपला यांची भेट घेण्यास आले. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वानखेडे यांनी बनावट प्रमाणपत्रांचा वापर केल्याचा आरोप महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केल्यानंतर वानखेडे यांनी दिल्लीतील अनुसूचित जाती आयोगात दाखल झाले. दरम्यान शनिवारी समीर वानखेडे यांनी मुंबईत एससी/एसटी आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. याच्याशी भेटीनंतर अरुण हलदर यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना समीर वानखेडे यांनी कोणताही धर्म परिवर्तन केलेला नाही, असे सांगितले होते. त्यानंतर नवाब मलिक यांनी आज पुन्हा वानखेडे आणि कुटुंबीयांवर निशाणा साधला होता.

आज पुन्हा त्यांनी  एससी/एसटी आयोगाचे उपाध्यक्षांच्या निर्णयाववर शंका उपस्थित केली आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी आज (सोमवार) दिल्लीत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष रामनाथ पारधी यांची भेट घेतली. “समीर वानखेडे आयोगासमोर आपला विषय मांडण्यासाठी आले होते. आम्ही त्यांची कागदपत्रे पाहू आणि पडताळू”, असे पारधी यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांनी सांगितले की, “आज एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे मला भेटायला आले होते. त्यांनी २९ ऑक्टोबरला तक्रारही केली होती,

त्याआधारे आम्ही महाराष्ट्राचे गृहसचिव आणि इतर अधिकाऱ्यांना नोटीस बजावून ७ दिवसांत उत्तर मागितले होते. आज त्यांनी त्यांचा धर्म आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित सर्व कागदपत्रे दिली. ते आम्ही महाराष्ट्र सरकारकडे पाठवले असून ही सर्व कागदपत्रे बरोबर असल्याचे आढळल्यास त्यांना त्रास देऊ नये. समीर वानखेडे यांनी आपण अनुसूचित जातीतून आल्याचे सांगितले. यासंबंधीची सर्व कागदपत्रे त्यांनी आयोगाला दिली आहेत.”

नवाब मलिकांनी काय केले आरोप 

नुकतेच महाराष्ट्राचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळाल्याचा दावा केला आहे. वानखेडेंमुळे एक पात्र दलित नोकरीपासून वंचित राहिला, असे नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक डॉक्युमेंटही शेअर केले होते. मलिक म्हणाले की, वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यानंतर समीरने दलित प्रमाणपत्राचा वापर करून दलित उमेदवाराची संधी हिसकावून घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी