Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांनी सोमय्यांना चपलेने मारावे, संजय राऊत यांची टीका

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली लोकांकडून पैसे जमा केले आणि पीएमसी बँकेतून हा पैसा पांढरा केला असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रभक्त असून ते अशा किरीट सोमय्याची बाजू घेतात, त्यांनी सोमय्यांना जनतेसमोर चपलेने मारावे असेही राऊत म्हणाले.

Sanjay Raut
संजय राऊत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली लोकांकडून पैसे जमा केले
  • भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रभक्त असून ते अशा किरीट सोमय्याची बाजू घेतात
  • त्यांनी सोमय्यांना जनतेसमोर चपलेने मारावे असेही राऊत म्हणाले.

Sanjay Raut : नवी दिल्ली : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली लोकांकडून पैसे जमा केले आणि पीएमसी बँकेतून हा पैसा पांढरा केला असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रभक्त असून ते अशा किरीट सोमय्याची बाजू घेतात, त्यांनी सोमय्यांना जनतेसमोर चपलेने मारावे असेही राऊत म्हणाले.

आज दिल्लीत संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. राऊत यांनी सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत या युद्धनौकेसाठी लोकांकडून पैसे जमा केले आणि ते घशात घातले असा आरोप केला. राऊत म्हणाले की, एक रुपयाचा जरी कोणी भ्रष्टाचा केलार तरी कायद्याने तो गुन्हा असून त्याच्या शिक्षेची तरतूद आहे. असे राऊत म्हणाले. 

किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रातंच्या नावाखाली पैसे गोळा केले. सोमय्या यांनी देशभावना, लोकभावनेच खेळ करून मातृभूमीचा लिलाव केला. असे असले तरी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस विचारतात की पुरावे कुठे आहेत. फडणवीस हे संघाचे कार्यकर्ते आहेत, हे नेहमी दुसर्‍याला राष्ट्रभक्ती शिकवतात आणि त्यांचे नेते राष्ट्रभक्तीच्या नावाने घोटाळे करतात. फडणवीस अशा देशद्रोही व्यक्तीची बाजू घेत आहेत हे पाहून हेडगेवार, गोळवलकर, बाळासाहेब देवरस यांचा जीव तीळतीळ तुटला असेल असे सोमय्या म्हणाले.  


राऊत म्हणाले की,भारतीय जनता पक्षाचे महात्मा किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला. आणि फडणवीस अजूनही त्यांची बाजू घेतात. फडणवीस यांनी सोमय्या यांना जनतेसमोर चपलेने मारले पाहिजे.  काल फडणवीस म्हणाले की आम्हाला नखं कापून शहीद होण्याची सवय आहे. तुम्ही काय उपटलीत ते सांगा. या देशासाठीत तुम्ही काय बलिदान केले आणि तुम्ही काय योगदान आहे ते सांगा. उलट या देशासाठी ज्यांनी बलिदान केले त्यांच तुम्ही लिलाव केला या महाराष्ट्रात. कधी राममंदिराच्या नावाने पैसे गोळा केले, कधी गंगाजल विकून पैसे गोळा केले. महाराष्ट्रात आयएनएस विक्रांत आमचा स्वाभिमान आहे.  त्याचा लिलाव केला आणि ज्यांनी हे केलं त्याची फडणवीस बाजू घेतात. मी अभ्यासाशिवय बोलत नाही, पुराव्याशिवाय बोलत नाही. आम्ही सांगतो तो पुरावा नाही का? राजभवन भाजपकडेच आहे, त्याच राजभवनाकडे आम्ही भ्रष्टाचाराचा पुरावा दिला आहे. लोकांना मुर्ख बनवण्याचे जे धंदे उभे केले आहेत, ते मुखवटे आता गळून पडलेले आहेत. हे एक प्रकरण समोर आले आहे, त्यांच्या दृष्टीने भविष्यात आणखीन विषय मी मांडणार आहे. आयएनएस विक्रांत जरी या लोकांनी भंगारात घालवली असली तरी या अरबी समुद्रात विक्रांतच्या नावाने भ्रष्टाचार करणार्‍या फालतू नेत्यांना आणि पक्षाला बुडवल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही असेही राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले की,  तुम्ही कितीनी पाठीत खंजीर खुपसले तरी शिवसैनिकाचे मनोबल खचणार नाही. भाजप नेत्यांची खूप नौटंकी झाली, लोक त्यांना चपलेने बडवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र सगळं सहन करेल परंतु या देशाचे रक्षण करणे महाराष्ट्राचा पीढीजात धंदा आहे. महाराष्ट्रात जर कोणी गद्दार निपजला असेल तर त्याला या मातीतच गाडल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही असेही राऊत म्हणाले.  या भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी आहे. आयएनएस विक्रांतच्या नावाखाली देशभरातून पैसे गोळा केले होते. किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाने ७११ मोठ्या बॉक्समधून पैसे गोळा केले. हे सर्व बॉक्स सोमय्या यांच्या नीलमनगर कार्यालयात आणले गेले. या पैश्यांचे बंडल बांधण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते तिथे बोलवण्यात आले होते. हे पैसे पीएमसी बँकेत वळवण्यात आले. आणि हे पैसे व्हाईट करून नील सोमय्याच्या व्यवसायात आणि किरीट सोमय्या यांच्या निवडणुकीत वापरण्यात आले. महाराष्ट्रातून ५८ कोटी रुपये जमा झाले होते. परंतु हा घोटाळा आणखी मोठा आहे असेही राऊत म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी