प्रसिद्ध वास्तू तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची हॉटेलमध्ये निर्घृण हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद 

Saral Vastu exponent Chandrashekhar Angadi stabbed, incident caught in cctv: प्रसिद्ध वास्तू तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये शिरुन दोघांनी चाकू भोसकून चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या केली.

Saral Vastu exponent Chandrashekhar Angadi guruji stabbed in Hubballi hotel incident live murder video caught in cctv karnataka
प्रसिद्ध वास्तू तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची हॉटेलमध्ये निर्घृण हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद  
थोडं पण कामाचं
  • सरल वास्तू चे एक्सपर्ट चंद्रशेखर गुरुजी यांची भरदिवसा हत्या
  • हॉटेलमध्ये घुसून चाकूने भोसकून केली हत्या 
  • हत्येची घटना हॉटेलमधील सीसीटीव्हीत कैद 

Chandrashekhar Guruji murder caught in CCTV: 'सरल वास्तू'च्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख केलेले आणि प्रसिद्ध वास्तू तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. कर्नाटकातील हुबळी येथील एका हॉटेलमध्ये चाकूने भोसकून त्यांची हत्या केली आहे. हत्येची ही संपूर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. भरदिवसा हॉटेलच्या रिसेप्शनवर घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

चंद्रशेखर अंगडी हे हुबळी येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी दोन इसम आले. या इसमांची भेट घेण्यासाठी चंद्रशेखर गुरुजी रिसेप्शनवर गेले. त्यावेळी त्या दोन तरुणांनी सुरुवातीला चंद्रशेखर गुरुजी यांच्यासोबत बोलण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान त्या दोघांनी आपल्याकडील चाकू काढून चंद्रशेखर गुरुजी यांच्यावर चाकूने वार केले.

ही संपूर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्हीत दिसत आहे की, ज्यावेळी आरोपींनी चंद्रशेखर गुरुजी यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली त्यावेळी घटनास्थळी आणखी काही नागरिक आणि हॉटेलचा स्टाफही उपस्थित होता.

नेमकं काय घडलं हे सुरुवातीला कुणालाच कळालं नाही. अखेर नंतर थोडी हिंमत करत काहींनी चंद्रशेखर गुरुजी यांच्या दिशेने चाल केली. मात्र, आरोपींनी आपल्याकडील चाकूचा धाक दाखवत त्यांना रोखले.

चंद्रशेखर अंगडी यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक कंत्राटदार म्हणून केली होती. पुढे त्यांना मुंबईत नोकरी लागली. त्यानंतर त्यांनी वास्तूचं काम सुरू केले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चंद्रशेखर गुरुजी हे आपल्या काही कामासाठी हुबळी येथे आले होते आणि त्याचवेळी ही घटना घडली. या प्रकरणात आता पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आपला तपास करत आहेत.

हे पण वाचा : 200 मीटर दरीत कोसळली बस; 16 जणांचा मृत्यू, बसमध्ये होते शाळकरी मुलं

चंद्रशेखर गुरुजी हे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्या दोन इसमांना भेटले आणि त्या आरोपींनी चंद्रशेखर गुरुजींवर चाकूने वार केले. हल्ला केल्यावर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर चंद्रशेखर गुरुजी यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी