Sardar Patel Birth Anniversary : भारताशी विलग होऊन पाकिस्तानचे भले होणार नाही, सरदार पटेल यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी

Sardar Patel Birth Anniversary :1947 साली  भारत आणि पाकिस्तानचे विभाजन झाले होते. परंतु भारतापासून फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानचे भले होणार नाही अशी भविष्यवाणी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी केली होती. आज पाकिस्तानची अवस्था पाहता पटेल किती दूरदर्शी होते याची प्रचिती पहायाला मिळत आहे.

sardar patel birth anniversary
सरदार पटेल जयंती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 1947 साली  भारत आणि पाकिस्तानचे विभाजन झाले होते.
  • परंतु भारतापासून फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानचे भले होणार नाही अशी भविष्यवाणी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी केली होती.
  • आज पाकिस्तानची अवस्था पाहता पटेल किती दूरदर्शी होते याची प्रचिती पहायाला मिळत आहे.

Sardar Patel Birth Anniversary : 1947 साली  भारत आणि पाकिस्तानचे विभाजन झाले होते. परंतु  भारतापासून फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानचे भले होणार नाही अशी भविष्यवाणी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी केली होती. आज पाकिस्तानची अवस्था पाहता पटेल किती दूरदर्शी होते याची प्रचिती पहायाला मिळत आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक संस्थान स्वतंत्र राहण्याच्या तयारीत होते तर काही पाकिस्तानमध्ये सामील होण्याच्या विचारात होती. तेव्हा पटेल यांनी 565 संस्थाने भारतात विलीन करून घेतली आणि आजचा हा भारत आपल्याला पहायला मिळत आहे. आज पटेल यांची जयंती आहे जाणून घेऊया त्याच्या दूरदृष्टीबद्दल. (sardar patel birth anniversary patel views on pakistan was true after long years)

अधिक वाचा : Gujarat मध्ये केबल पूल तुटला..., सुमारे 500 लोक नदीत बुडाले, मृत्युचा थरार कॅमेऱ्यात कैद

भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरु पंतप्रधान झाले. तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात मौलाना अबुल कलाम आझाद हे शिक्षणमंत्री होते. आझाद हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते. त्यांनी आझादी की कहानी हे पुस्तक लिहिले असून त्यात पटेल यांचे फाळणीबद्दल काय विचार होते याबद्दल उहापोह केला आहे. 

अधिक वाचा :  Washington Square Shocking Fact : या प्रसिद्ध उद्यानाखाली पुरलेले आहेत 20 हजारांहून अधिक मृतदेह...जगातील भुताटकीच्या जागांमध्ये समावेश

पटेल फाळणीच्या वेळी म्हणाले होते, थोड्याच काळात पाकिस्तानचा हा डोलारा कोसळणार आहे. त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरली आणि १९७१ साली पाकिस्तानची फाळणी झाली आणि स्वतंत्र बांग्लादेशची निर्मिती झाली. पटेल म्हणाले होते की वेगळा पाकिस्तान मागून मुल्सिम लीगच्या नेत्यांना चांगला धडा मिळणार आहे. भारताशी विलग होऊन पाकिस्तानचे भले होणार नाही अशी भविष्यवाणी पटेल यांनी केली होती. जो देश भारतापासून वेगळा होईल, त्या देशाला अनेक समस्यांचा आणि संकटाचा सामना करावा लागेल असे पटेल म्हणाले होते. 

अधिक वाचा :  Gujarat Election 2022 : या आठवड्यात गुजरात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता, निवडणूक आयोग करणार घोषणा

आज पाकिस्तानची अवस्था पाहता खरेच पटेल किती दूरदृष्टीचे होते हे कळते. आज पाकिस्तानात आर्थिक आणि राजकीय संकटं आहेत. पाकिस्तानच्या निर्मितीपासून एकही पंतप्रधानाने आपली पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण केली नाही. पाकिस्तानात लोकशाही उरलेली नाही तर तिथे फक्त सैन्याचा हस्तक्षेप वाढला आहे. पाकिस्तानला दहशतवादाने पोखरले असून तिथली जनता बेहाल झाली आहे. 

फाळणीला काँग्रेस नेत्यांचाही विरोध

 भारत पाकिस्तानच्या फाळणीला काँग्रेस नेत्यांचाही विरोध होता असे मौलाना आझाद यांनी आपल्या पुस्तकात म्हटले होते. परंतु काँग्रेस नेतेही हतबल झाले होते, म्हणून त्यांना ही मागणी मान्य करावी लागली होती. आझाद यांना काही पाकिस्तानच्या मागणीसाठी मुस्लिम लीगचे नेते आले होते, तेव्हा यातील अनेक नेते रागात होते आणि काँग्रेस नेत्यांबद्दल रोष व्यक्त करत होते असे आझाद यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. फाळणीनंतरही काही मुस्लिम नेते आझाद यांना भेटायला आले तेव्हा त्यांनी बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी आम्हाला धोका दिला आणि मधल्यामध्ये आम्हाला सोडून दिले अशी खंत काही नेत्यांनी व्यक्त केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी