जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर सियाचीन ग्लेशियरवर इंटरनेट सेवा सुरू

Satellite based internet service activated on the Siachen Glacier the Worlds Highest Battlefield : भारताने एक अशी कामगिरी केली आहे ज्यामुळे शत्रुची झोप उडाली आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी ही कामगिरी आहे.

 internet service activated on the Siachen
जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर सियाचीन ग्लेशियरवर इंटरनेट सेवा सुरू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर सियाचीन ग्लेशियरवर इंटरनेट सेवा सुरू
  • भारताच्या सैनिकांना संवाद साधणे तसेच महत्त्वाच्या माहितीची मुख्यालयासोबत देवाणघेवाण करणे सोपे होणार
  • सियाचीनमध्ये 19 हजार 61 फुटांवर उपग्रहांच्या माध्यमातून इंटरनेट सेवा

Satellite based internet service activated on the Siachen Glacier the Worlds Highest Battlefield : भारताने एक अशी कामगिरी केली आहे ज्यामुळे शत्रुची झोप उडाली आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी ही कामगिरी आहे. भारताने जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर सियाचीन ग्लेशियरवर इंटरनेट सेवा सुरू केली आहे. यामुळे सियाचीनमध्ये देशाच्या सीमेचे रक्षण करत असलेल्या भारताच्या सैनिकांना संवाद साधणे तसेच महत्त्वाच्या माहितीची मुख्यालयासोबत देवाणघेवाण करणे सोपे होणार आहे. 

Mobile इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुरळीत नसल्यास 'हे' करा

मान्सून फिटनेस मंत्रा

सियाचीनमध्ये वर्षभर उणे वीस अंश से. तापमान किंवा त्यापेक्षा कमी तापमान असते. थंडीच्या दिवसांत सियाचीनमध्ये उणे पन्नास अंश से. तापमान असते. या प्रतिकूल वातावरणामुळे सियाचीनमध्ये इंटरनेट सेवा देणे आव्हानात्मक होते. पण भारताने हे आव्हान पेलले आणि सियाचीनमध्ये इंटरनेट सेवा सुरू केली आहे.

महिला आणि पुरुषांच्या आरोग्यासाठी गुणकारी गुळ​

आरोग्यदायी संजिवनी आहे पुदिना

सियाचीन सिग्नल टीमने ग्लेशियरवर उपग्रहांच्या माध्यमातून इंटरनेट सेवा सुरू केली आहे. भारतीय सैन्य या इंटरनेट सेवेचा वापर करणार आहे. सैन्याच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने ट्वीट करून सियाचीनमध्ये इंटरनेट सेवा सुरू केल्याचे जाहीर केले. सियाचीनमध्ये 19 हजार 61 फुटांवर उपग्रहांच्या माध्यमातून इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. लष्करीदृष्ट्या हे भारतासाठी मोठे यश आहे. 

फायर अँड फ्युरी XIV कॉर्प्स कारगिल आणि लेह परिसरात आहे. चीन आणि पाकिस्तान लगतच्या भारताच्या सीमेवर फायर अँड फ्युरी XIV कॉर्प्स कार्यरत आहे. सियाचीनमध्ये सुरू झालेल्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे सैन्याला महत्त्वाच्या माहितीची मुख्यालयासोबत देवाणघेवाण करणे सोपे होणार आहे. सैन्याव्यतिरिक्त कारगिल आणि लेह भागातील ग्राम पंचायतींना आणि नागरिकांनाही इंटरनेट वापरता येणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी