भारत-चीन तणाव पुन्हा वाढणार?

Satellite imagery Says China building new bridge near Pangong Tso in eastern Ladakh : भारत आणि चीन यांच्या दरम्यान तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. उपग्रहाने काढलेल्या फोटोंमध्ये चीन पँगाँग त्सो लेकजवळ बांधत असलेला दुसरा पूल दिसत आहे.

Satellite imagery Says China building new bridge near Pangong Tso in eastern Ladakh
भारत-चीन तणाव पुन्हा वाढणार? 
थोडं पण कामाचं
  • भारत-चीन तणाव पुन्हा वाढणार?
  • चीन पँगाँग त्सो जवळ आणखी एक पूल बांधत आहे
  • चीन करत असलेल्या या बांधकामामुळे तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता

Satellite imagery Says China building new bridge near Pangong Tso in eastern Ladakh : नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्या दरम्यान तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. उपग्रहाने काढलेल्या फोटोंमध्ये चीन पँगाँग त्सो लेकजवळ बांधत असलेला दुसरा पूल दिसत आहे. चीन सैनिकांना पँगाँग त्सो जवळ वेगाने आणण्यासाठी दुसऱ्या पुलाची निर्मिती करत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा अर्थात लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल (Line of Actual Control - LAC) पासून २० किमी दूर चीनच्या ताब्यातील भूभागात चिनी सैन्य पुलाचे बांधकाम करत आहे. चीन करत असलेल्या या बांधकामामुळे तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे; अशा स्वरुपाचे वृत्त 'द प्रिंट'दिले आहे.

दोन वर्षांपूर्वी लडाखमध्ये भारत आणि चीन दरम्यान तणाव वाढला होता. पण या घटनेकडे दुर्लक्ष करत चीनने बांधकाम सुरू केले आहे. चीनच्या या हालचालींना भारताने अद्याप उत्तर दिलेले नाही. मात्र पुढील काही दिवसांत या मुद्यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे.

याआधी ऑगस्ट २०२० मध्ये चीनच्या सैनिकांनी लडाखमध्ये भारतीय सैनिकांना धमकाविण्याचा प्रयत्न केला. या नंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला. भारताने पँगाँग लेकच्या (पँगाँग तलाव) दक्षिणेकडील सर्व उंच डोंगरांना ताब्यात घेऊन मोक्याच्या जागांवर लष्करी मोर्चेबांधणी केली. यानंतर शांत झालेल्या चीनने आता त्यांच्या ताब्यातील भूभागात लष्कराच्या वेगवान हालचालींसाठी पुलाची निर्मिती सुरू केली आहे. 

तणाव कमी जास्त असला तरी तरी भारत आणि चीन आपापल्या ताब्यातील भूभागात लष्कराच्या वेगवान हालचालींसाठी रस्ते, पूल यांची निर्मिती करत आहेत. दोन्ही देशांनी स्वतःच्या सैनिकांच्या संरक्षणासाठी ठिकठिकाणी बंकर निर्मिती सुरू केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी