कासवांवर बसवले सॅटलाईट ट्रान्समीटर, पश्चिम किनारपट्टीवरील ऑलिव्ह रिडलेंच्या स्थलांतराच्या अभ्यासासाठी प्रयोग

भारतातील पश्चिम किनारपट्टीवरील ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटलाईट ट्रान्समीटर प्रयोग यशस्वी झाला असून , आता ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या स्थलांतरांचा अभ्यास होण्यास मदत होणार आहे .

Satellite transmitter for turtles, experiments to study the migration of olive ridley on the west coast
कासवांना बसवले सॅटलाईट ट्रान्समीटर, पश्चिम किनारपट्टीवरील ऑलिव्ह रिडलेंच्या स्थलांतराच्या अभ्यासासाठी प्रयोग   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भारतातील पश्चिम किनारपट्टीवरील ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटलाईट ट्रान्समीटर
  • ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या स्थलांतरांच्या अभ्यासासाठी मदत
  • रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास व आंजर्ले या दोन ठिकाणी प्रयोग

रत्नागिरी : भारतीतील पश्चिम समुद्र किनारपट्टीवर येणा-या ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजातींना सॅटलाईट ट्रान्समीटर लावून त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली आहे. नुकतेच या उपक्रमातील पहिल्या दोन कांसविनीना हे उपकरण बसवण्यात पथकाला यश आले आहे.
मँग्रोव्ह फाऊंडेशन व भारतीय वन्यजीव संस्थान मार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास व आंजर्ले या दोन ठिकाणी हा उपक्रम यशस्वी झाला आहे. त्यामुळे आता ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या स्थलांतरांचा अभ्यास होण्यास मदत होणार आहे. (Satellite transmitter for turtles, experiments to study the migration of olive ridley on the west coast)

भारतीतील पष्चिम किनारपट्टीवर येणा-या ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजातींना सॅटलाईट ट्रान्समीटर लावून त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली आहे. कोकण किनारपट्टीवर विणीसाठी येणा-या सागरी कासवांच्या अभ्यासाकरिता हे यंत्र बसवण्यात आले वेळास  व आंजर्ले येथील एक  अशा दोना मादी कासवांना अशा  प्रकारचे उपकरण दि.24 जानेवारी रोजी मध्यरात्री दोन कासवांना सॅटलाईट ट्रान्समीटर लावून त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रथमच समुद्री कासवांना सॅटलाईट ट्रान्समीटर लावून त्यांचा स्थलांतराचा अभ्यास करण्यात येत आहे. हा अभ्यासप्रकल्प कांदळवन कक्ष, मँग्रोव्ह फाऊंडेशन आणि भारतीय वन्यजीव संस्थान मार्फत (डब्लूआयआय) राबविण्यात आला आहे.

दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यादरम्यान ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी कासवे कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात. अरबी समुद्रातील त्यांचा अधिवास आणि स्थलांतर जाणून घेण्यासाठी त्यांना सॅटलाईट ट्रान्समीटर लावण्याचा निर्णय मँग्रोव्ह फाऊंडेशनश्ने घेतला. याअंतर्गत पाच मादी कासवांना सॅटलाईट ट्रान्समीटर लावण्यात येणार आहेत. यामधील दोन कासवांना मंगळवारी मध्यरात्री सॅटलाईट ट्रान्समीटर लावण्यात आले. मंडणगड तालुक्यातील वेळासच्या किनार्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या ऑलिव्ह रिडले मादी कासवाला डब्लूआयआयचे शास्त्रज्ञ डॉ.आर.सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शना अंतर्गत सॅटलाईट ट्रान्समीटर लावण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी