सौदी किंग अब्दुल्लाचा खून करू इच्छित होते क्राउन प्रिन्स सलमान...मोठा खुलासा

हा माजी अधिकारी सध्या कॅनडात राहत आहेत. साद अल जाबरीने आरोप केला की २०१४ मध्ये प्रिन्स मोहम्मद बिन सलमानने म्हटले होते की ते शाह अब्दुल्ला (Shah Abdullah)यांची हत्या करू इच्छितात.

Crown Prince Mohammed bin Salman
क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान 
थोडं पण कामाचं
  • सौदी अरेबियाच्या एका माजी वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप
  • प्रिन्स मोहम्मद बिन सलमानने किंग अब्दुल्लांची हत्या करू इच्छित होता
  • शाह अब्दुल्ला यांच्या निधनानंतर त्यांचे स्थान जानेवारी २०१५ मध्ये शाह सलमान याने घेतले होते

नवी दिल्ली: अमेरिका (America)आणि सौदी अरेबियातील (Saudi Arabia)दहशतवादविरोधी संयुक्त प्रयत्नांमध्ये सहभागी असलेल्या सौदी अरेबियाच्या एका माजी वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने एक धक्कादायक आरोप केला आहे. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमानने (Crown Prince Mohammed bin Salman)आपले वडील शाह बनण्याआधी तत्कालीन शाह यांची हत्या करण्याचा विचार मांडला होता. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी अधिकारी साद अल-जाबरी यांनी हा दावा केला. मात्र आपल्या दाव्यासंदर्भात त्यांनी कोणताही पुरावा दिला नाही. (Saudi Arabia: Crown Prince Mohammed bin Salman wanted to kill King Abdulla)

अल जाबरीचा आरोप

हा माजी अधिकारी सध्या कॅनडात राहत आहेत. साद अल जाबरीने आरोप केला की २०१४ मध्ये प्रिन्स मोहम्मद बिन सलमानने म्हटले होते की ते शाह अब्दुल्ला (Shah Abdullah)यांची हत्या करू इच्छितात. त्यावेळेस प्रिन्स मोहम्मद सरकारमध्ये कोणत्याही वरिष्ठ पदावर नव्हते. शाह अब्दुल्ला यांच्या निधनानंतर त्यांचे स्थान जानेवारी २०१५ मध्ये शाह सलमान याने घेतले होते.

पिन्स मोहम्मद बिन सलमान यांना आव्हान

अल जाबरीने या मुलाखतीत प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना वॉर्निंग दिली की त्यांच्याकडे एक व्हिडिओ आहे ज्यात शाही कुटुंबाशी निगडीत अनेक गुपीते आणि अमेरिकेसंदर्भातील अनेक गोपनीय माहिती आहे. ६२ वर्षांच्या अल जाबरीने म्हटले की क्राउन प्रिन्स तोपर्यत गप्प बसणार नाहीत जोपर्यत ते मला मेलेले पाहत नाहीत. कारण माझ्याकडे असलेल्या गुपीतांमुळे ते घाबरलेले आहेत. अल-जाबरीने प्रिन्स मोहम्मद बिन सलमान याला मनोरोगी आणि खुनी म्हटले आहे.

अल-जाबरीवर काल्पनिक कथा सांगितल्याचा आरोप

सौदी अरेबियाच्या  सरकारने म्हटले आहे की अल जाबरी हा एक माजी बदनाम अधिकारी आहे. त्याने आपल्या आर्थिक गुन्ह्यांवर पडदा टाकण्यासाठी काल्पनिक कथा तयार केल्या आहेत. याआधीही त्याने अशा कथा तयार करून लक्ष दुसरीकडेच नेल्याचे प्रकार घडले आहेत. सरकारने अल-जाबरी याने समर्पण करावे असे म्हटले आहे . त्यासाठी सौदी सरकारने इंटरपोल नोटिस जाहीर केली आहे. यामध्ये आरोप करण्यात आला आहे की या अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. तर अल-जाबरीचे म्हणणे आहे की त्यांनी ही संपत्ती शाही कुटुंबांच्या सेवेत मिळवलेली आहे.

सौदी अरेबियाचा इतिहास हा अशाच अनेक गूढ कथा आणि कटकारस्थानांनी भरलेला आहे. तिथे सत्तांतर होताना काहीतरी कारस्थान होतच असते. त्यातच आखातातील अमेरिकेच्या राजकारणात सौदी अरेबिया हा महत्त्वाचा देश असल्यामुळे या दोन्ही देशांच्या संयुक्त कारवाया, कट कारस्थाने यांची नेहमीच चर्चा होत आली आहे. अमेरिकेच्या पेट्रोलियम कंपन्या आणि सौदी शाही कुटुंब यांचे हितसंबंध, अमेरिकेच्या सरकारशी सौदी कुटुंबाची हातमिळवणी याविषयी याआधीही अनेक आरोप झालेले आहेत. सौदी अरेबियाच्या शाही कुटुंबाची अनेक गुपीते दडलेली आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी