सौदीत बनणार जगातील सर्वात मोठी इमारत, ५०० अब्ज डॉलरचा प्रकल्प

Saudi Arabia's $500 Billion Plan For World's Largest Buildings Ever : सौदी अरेबिया नियोम (NEOM) येथे जगातील सर्वात मोठी इमारत बांधणार आहे.

Saudi Arabia's $500 Billion Plan For World's Largest Buildings Ever
सौदीत बनणार जगातील सर्वात मोठी इमारत  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सौदीत बनणार जगातील सर्वात मोठी इमारत
  • ५०० अब्ज डॉलरचा प्रकल्प
  •  इमारतीच्या माध्यमातून सौदीत मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याची योजना

Saudi Arabia's $500 Billion Plan For World's Largest Buildings Ever : सौदी अरेबिया नियोम (NEOM) येथे जगातील सर्वात मोठी इमारत बांधणार आहे. या इमारतीच्या प्रकल्पासाठी ५०० अब्ज डॉलर एवढ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ज्या भागात इमारत बांधली जाणार आहे त्या भागात सध्या तुरळक नागरी वस्ती आहे. 

सौदी अरेबियात प्रस्तावीत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या इमारतीत अनेक व्यावसायिक आस्थापने असतील. इमारत ५०० मीटर लांबीची असेल.     इमारतीच्या माध्यमातून सौदीत मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याची योजना आहे. 

सौदी अरेबिया देशाच्या अर्थव्यवस्थेचे तेलावरील अवलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न करत आहे. जगातील सर्वात मोठ्या इमारतीचा प्रकल्प हा त्याच धोरणाचा एक भाग म्हणून राबविला जाणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी