Veer Savarkar : बेंगळुरु : कर्नाटकातील कानडी भाषेच्या पुस्तकातील एक परिच्छेद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वीर सावरकर जेव्हा काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते तेव्हा एका बुलबुल पक्षावर बसून ते मातृभूमीला भेट द्यायचे असे य परिच्छेदात म्हटले आहे. हा परिच्छेद सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती, या समितीने हा धडा कानडी भाषेच्य पुस्तकात समाविष्ट केला होता. नंतर ही समिती बरखास्त करण्यात आली होती.
"Savarkar Used to visit homeland and return to Jail sitting on the wings of BulBul bird which entered his Andaman cell which didn't even had any windows" — Mohammed Irshad (@Shaad_Bajpe) August 26, 2022
Photos of a lesson named 'Kaalavannu Geddavaru' allegedly from 8th standard textbook is getting viral on social media. pic.twitter.com/RVXvZmt5ai
आठवीच्या कानडी भाषेच्या पाठपुस्तकात ब्लड ग्रुपव नावाचा धडा समाविष्ट करण्यात आला होता. के.टी गट्टी हे लेखक अंदमानच्या सेल्युलर तुरुंगाच्या भेटीला जातात त्याचे हे प्रवासवर्णन आहे. त्यात गट्टी म्हणतात की सेल्युलर तुरुंगात सावरकर काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते, परंतु त्यांच्या या कोठडीत एक बुलबुल पक्षी यायचा आणि सावरकर त्यावर स्वार होऊन मातृभूमीला भेट द्यायचे. ही कोठडी पूर्णपणे बंद होती, तरी हा बुलबुल पक्षी कुठुन तरी यायचा आणि सावरकारंना मातृभूमी दर्शन द्यायचा असे या धड्यात म्हटले होते. या प्रकरणी पाठ्यपुस्तक समितीकडे तक्रार करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तक समितीने या तक्रारीची दखल घेत तपास सुरू केला आहे.