मराठा आरक्षण: नाही पोहोचले सरकारी वकील, सुप्रीम कोर्टाने स्थगित केली सुनावणी

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 27, 2020 | 19:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

maratha reservation: सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी स्थगित केली आहे. वरिष्ठ वकील न्यायालयात गैरहजर राहिल्याने कोर्टाने याचिकेवरील सुनावणी चार आठवड्यांसाठी स्थगित केली.

maratha reservation
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावरील सुनावणी केली स्थगित 

थोडं पण कामाचं

  • आज सुरूवातीलाच न्यायालयाने काही वेळासाठी सुनावणी थांबवली.
  • वरिष्ठ वकील न्यायालयात गैरहजर
  • महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि पोलीस भर्ती परीक्षाही स्थगित केली आहे. 

मुंबई: सुप्रीम कोर्टाने मंगळवारी मराठा आरक्षण प्रकरणाची(maratha rerservation) सुनावणी चार आठवड्यांसाठी स्थगित केली आहे. गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टाने(supreme court) महाराष्ट्रात मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षण संस्थांमध्ये कोटा उपलब्ध करून देण्याच्या निर्णयावर स्थगिती दिली होती. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयातच पुर्नविचार याचिका दाखल करण्यात आली होती. यावर मंगळवारी पहिली सुनावणी होणार होती. 

आज सुरूवातीलाच न्यायालयाने काही वेळासाठी सुनावणी थांबवली. मात्र महाराष्ट्र सरकारकडून वरिष्ठ वकील न्यायालयात गैर हजर राहिल्याने कोर्टाने याचिकेवरील सुनावणी चार आठवड्यांसाठी स्थगित केली. गेल्या काही आठवड्यांपासून मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मराठा आरक्षण कायम राखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून पावले उचलण्याची मागणी करत विरोध प्रदर्शन करतआहे. या दबावाखाली महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि पोलीस भरती परीक्षाही स्थगित केली आहे. 

जेव्हा भाजपचे खासदार संभाजीराजे यांनी उद्धव सरकारवर आरोप लावला की असे वाटते की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार काहीच करत नाही आहे. ते म्हणाले, मी अनेकदा सरकारला आठवण करून दिली आहे. अशोक चव्हाण यांच्याशी बोलणेही झाले मात्र उपसमितीची बैठक झालेलीनाही. राज्य सरार असे का करत आहे. तुम्ही मराठा समाजाला असे का पाहत आहात?

२०१८मध्ये झाले होते मोठे आंदोलन

मराठा समाजाच्या लोकांनी २०१८मध्ये शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीवरून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार आंदोलन करण्यात आले होते. 

मराठा आरक्षणाबाबत काही जण राजकारण करत असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान, ज्यांना सरकारवर विश्वास नसेल त्यांनी त्यांचा वकील लावावा अशी प्रतिक्रिया त्यांनी एका टीव्ही चॅनेलला दिली. 

राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली होती

मराठा आरक्षणासठी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यावर आक्रमक झालेल्या मराठा संघटनांनी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली होती. मराठा संघटनांकडून या प्रकरणी राज्य सरकारसोबत चर्चाही झाली होती. या चर्चेनंतर राज्य सरकारची एक बैठक झाली. या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी