जॉर्डनच्या संसदेत WWFसारखा नजारा, खासदार एकमेकांशी भिडतानाचा व्हिडिओ व्हायरल

jordan mps fights : WWF सारखे दृश्य जॉर्डनच्या संसदेत पाहायला मिळाले. येथे वाद सुरू असताना खासदार एकमेकांना भिडले. त्यांनी एकमेकांना लाथाबुक्कांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. देशाला लाजवेल अशी ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Scenes like the WWF in Jordan's parliament, MPs clashed with each other
जॉर्डनच्या संसदेत WWFसारखा नजारा, खासदार एकमेकांशी भिडतानाचा व्हिडिओ व्हायरल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • WWF सारखे दृश्य जॉर्डनच्या संसदेत पाहायला मिळाले.
  • खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्कांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
  • संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली

अम्मान: रस्त्यावर दिसणारी हिंसाचाराची दृश्ये आता संसदेतही (parliament) पाहायला मिळत आहेत. प्रत्येक अल्पावधीत असे काही चित्र समोर येते, जे लोकप्रतिनिधींचे संसदेतील असभ्य वर्तन दाखवते. आता जॉर्डनच्या (Jordan) संसदेत असे काही घडले आहे की पाहून सगळेच अचंबित झाले आहेत आणि देशाला लाज वाटली आहे. याठिकाणी वाद सुरू असताना खासदार (MP) एकमेकांशी भिडले आणि लाथा-बुक्क्यांचा वर्षाव झाला. संसदेतील या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Scenes like the WWF in Jordan's parliament, MPs clashed with each other)

असे बोलताच गदारोळ झाला

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जॉर्डनच्या संसदेत मंगळवारी जुटम-पजरची ही घटना घडली. खरे तर संसदेच्या कामकाजादरम्यान सभापतींनी एका उपसभापतीला संसदेतून बाहेर पडण्यास सांगितले, तेव्हा गदारोळ झाला. खासदारांमध्ये जोरदार वादावादी झाली आणि त्यानंतर जे घडले त्यामुळे संपूर्ण देशाला लाज वाटली. सभागृहात खासदार एकमेकांना भिडले.

खासदार आपापल्या जागेवर पडले

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये खासदार अचानक एकमेकांशी भिडल्याचे दिसत आहे. ते एकमेकांवर बुक्कांचा वर्षाव करतात. 1 मिनिटाहून अधिक कालावधीच्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, भांडणाच्या वेळी बरेच खासदार तेथे जमले आहेत.

घटनादुरुस्तीवर चर्चा

घटनादुरुस्तीबाबत जॉर्डनच्या संसदेत चर्चा सुरू असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. यादरम्यान एका खासदाराने सभागृहात असंसदीय वक्तव्य करून कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. यानंतर सभापतींनी त्यांना बाहेर जाण्याच्या सूचना दिल्याने संसदेत गदारोळ सुरू झाला. या मारामारीत कोणीही गंभीर जखमी झाले नाही. काही खासदारांना किरकोळ दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे 1952 मध्ये जॉर्डनमध्ये राज्यघटना स्वीकारल्यापासून आतापर्यंत 29 वेळा संविधानात दुरुस्ती करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी