देशभरातल्या विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा 

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 11, 2019 | 21:08 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Modi Sarkar: मोदी सरकारनं विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.  मोदी सरकार  अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची योजना आणली आहे. पुढच्या पाच वर्षांत विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

scholarships for Indian Student
देशभरातल्या विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा   |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्लीः  अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारनं मोठी घोषणा केली आहे. या समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारनं स्कॉलरशिपची योजना आणली आहे. केंद्रिय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वीनं अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक- आर्थिक सशक्तीकरणासाठी पुढच्या पाच वर्षांत पाच कोटी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाईल आणि यात जास्त प्रमाणात मुलींची संख्या असेल. 

अल्पसंख्याक मंत्रालयाची अधीनस्थ संस्था मौलाना आझाद शिक्षा प्रतिष्ठान (एमएईएफ) ची ६५ वी सामान्य बैठकीनंतर नकवी यांनी प्रतिनिधींना ही माहिती दिली आहे. नक्वी यांनी सांगितलं की, अल्पसंख्याक समाजातील शाळांमधल्या ड्रॉपआऊट मुलींना देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांकडून ब्रिज कोर्स करून त्यांना शिक्षण आणि रोजगारासाठी जोडलं जाईल. देशातील मदरशांमध्ये मुख्यधाराच्या शिक्षणास उत्तेजन देण्यासाठी मदरशातील शिक्षकांना विविध शैक्षणिक संस्थांकडून प्रशिक्षण देण्यात येईल. त्यामुळे ते मदरशांमध्ये मुख्य भाषांमधील शिक्षण- हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, कॉम्प्युटर इत्यादी देऊ शकतात. हे काम पुढच्या महिन्यापासून सुरू करण्यात येईल.

नक्वी यांनी सांगितलं की,  3E एज्युकेशन (शिक्षण), रोजगार (रोजगार आणि रोजगाराच्या संधी) आणि सबलीकरण (सामाजिक-आर्थिक-सशक्तीकरण) कार्यक्रमाच्या अंतर्गत पुढच्या पाच वर्षांमध्ये पूर्व दहावी पास, दहावी पास आणि दहावीसह माध्यम अशा योजनांद्वारे पाच कोटी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाईल. ज्यात ५० टक्क्यांहून जास्त मुलींचा समावेश असणार आहे. यात आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलींसाठी १० लाखांहून अधिक 'बेगम हजरत महाल बालिका शिष्यवृत्ती' समाविष्ट आहे.

नक्वी यांनी म्हटलं की, अशा क्षेत्रांमध्ये जेथे शैक्षणिक संस्थांचे पुरेसे पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत तिथे पंतप्रधानांचे सार्वजनिक विकास कार्यक्रम (पीएमजेवीके) च्या अंतर्गत पॉलिटेक्निक, आय.टी.आय, मुलींचं वसतीगृह, शाळा, कॉलेज, गुरुकुल प्रकार निवासी शाळा, सामान्य सेवा केंद्र इत्यादी यांचं युद्ध स्तरावर निर्मिती सुरू करण्यात आली आहे. 

पुढे नक्वी यांनी सांगितलं की, रस्त्यांवरील नाटक, लघुपट इ. सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे जागरूकता आणि प्रोत्साहन अभियान आयोजित केले जाईल. यात पहिल्या टप्प्यात देशभरातील ६० अल्पसंख्यांक-बहुल जिल्हे निवडून ही अभियान सुरू करण्यात येईल. 

अल्पसंख्यांक कार्यमंत्री यांनी म्हटलं की, याव्यतिरिक्त, आर्थिकदृष्ट्या दुर्बल अल्पसंख्याक- मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध, पारसी-युवक केंद्रीय आणि राज्य प्रशासकीय सेवा, बँकिंग, कर्मचारी निवड आयोग, रेल्वे आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांसाठी विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येईल. राजस्थानमधील अलवर येथील जागतिक दर्जाच्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेचे बांधकाम लवकरच सुरू होणार असल्याचं नकवी यांनी सांगितलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी