मुसळधार पावसाचा कहर; पुराच्या पाण्यात नदीवरील पूल ओलांडणारी स्कूल बस गेली वाहून, LIVE VIDEO आला समोर

Flood situation after heavy rainfall: देशभरातील विविध राज्यांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे.

School bus swept away in flood after heavy rainfall in Uttarakhand live video goes viral
मुसळधार पावसाचा कहर; पुराच्या पाण्यात नदी ओलांडणारी स्कूल बस गेली वाहून, LIVE VIDEO आला समोर 
थोडं पण कामाचं
  • मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या-नाल्यांना पूर
  • पुराच्या पाण्यात स्कूल बस गेली वाहून, घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद

नवी दिल्ली : उत्तराखंड (Uttarakhand)मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy rainfall) पडत आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. तर काही ठिकाणी भूस्खलन सुद्धा झाले आहे. नद्यांना पूर आलेला असून काही ठिकाणी नदी ओलांडणाऱ्या पुलावरही पुराचं पाणी आल्याचं दिसत आहे. अशाच एका पुलावरुन जाणारी स्कूल बस पाण्याच्या प्रवाहात वाहून (School bus swept away) गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तराखंडमधील चंपावत येथे ही घटना घडली असून याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. (School bus swept away in flood, live video goes viral)

घटनेचा व्हिडिओ आला समोर

उत्तराखंडमधील चंपावत येथील टनकपूर जवळ ही घटना घडली आहे. नदीला पूर आला होता आणि पुराचे पाणी नदीवरील पुलावरुन वाहत होते. मात्र, असे असतानाही एका स्कूल बस चालकाने या पुलावरुन बस नेण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा प्रवाह इतका होता की, बस या पुराच्या पाण्यात वाहून गेली. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी बसमध्ये विद्यार्थी उपस्थित नव्हते.

ज्यावेळी बस चालकाने पुलावरुन बस नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा बसमध्ये केवळ चालक आणि त्याचा मदतनीस असे दोघेच उपस्थित होते. बस पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचं लक्षात येताच या बसमधील चालक आणि मदतनीस या दोघांनीही बसमधून उडी घेत आपले प्राण वाचवले.

बस पुलावरून पाण्यात कोसळल्याची ही घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी दाखल झाले. जेसीबीच्या सहाय्याने ही बस बाहेर काढण्यात आली आहे. मात्र, बस चालकाचे हे धाडस जीवावर बेतलं असतं. त्यामुळे पुरस्थिती असताना किंवा ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह अधिक आहे अशा ठिकाणी वाहन नेण्याचं नसतं धाडस करु नका.

हे पण वाचा : RBI चा 'या' सहकारी बँकेला दणका, फक्त काढता येणार इतके पैसे

काही दिवसांपूर्वी नागपुरात दुर्घटना

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतही अशाच प्रकारे मुसळधार पाऊस पडत आहे. विदर्भात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे नदीच्या पुलावरुन वाहणाऱ्या पाण्यातून स्कॉर्पिओ नेण्याचं धाडस एका चालकाने केलं आणि दुर्दैवाने ही गाडी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. प्रवाशांनी भरलेली ही गाडी नदीच्या प्रवाहात वाहून गेली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी